October 18, 2025 4:58 PM October 18, 2025 4:58 PM

views 18

गुजरात सरकारच्या नवनियुक्त मंत्र्यांनी स्विकारला पदभार

धनोत्रयोदशीच्या मुहूर्तावर गुजरात सरकारच्या नवनियुक्त मंत्र्यांनी आपापल्या खात्यांच्या पदभार स्वीकारला. उपमुख्यमंत्री हर्ष सांघवी यांनी धार्मिक पूजा केल्यानंतर पदभार स्वीकारला.  नरेश पटेल, ऋषिकेश पटेल, डॉ. प्रद्युम्न वाजा आणि रोजगार-कौशल्य आणि रोजगार राज्यमंत्री कांतीलाल अमृतीया यांनीही त्यांच्या खात्यांचा पदभार स्वीकारला. प्राथमिक माध्यमिक तसंच प्रौढ शिक्षण राज्यमंत्री रीवाबा जडेजा यांनीही त्यांच्या खात्याचा पदभार स्वीकारत पक्षाचे आभार मानले.

October 17, 2025 8:32 PM October 17, 2025 8:32 PM

views 53

गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. त्यात २१ नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली. माजी गृहराज्यमंत्री हर्ष सिंघवी यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आधीच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री असलेले प्रफुल्ल पानसेरिया यांना कॅबिनेट मंत्री पदी बढती मिळाली. क्रिकेटपटू रविंद्र जडेजा याची पत्नी रिवा बा यांनीही राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.   राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी गांधीनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल आणि भाजपाचे राष्ट्...