November 15, 2025 1:44 PM November 15, 2025 1:44 PM
22
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. स्वातंत्र्य सैनिक आणि आदिवासी समुदायाचे नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त आज आदिवासी गौरव दिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने नर्मदा जिल्ह्यातल्या देडियापाडा इथं एका कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी सहभागी होणार आहेत. ते ९ हजार ७०० कोटी रुपयांहून अधिकच्या विकास योजनांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत. या विकास योजनांच्या माध्यमातून या भागातल्या आदिवासी समाजाचा विकास आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत....