April 27, 2025 6:59 PM April 27, 2025 6:59 PM

views 19

बिहारच्या महाबोधी मंदिरात सर्वात मोठ्या ‘सिंगिंग बाऊल ऑन्साँबल’चा गिनीज बुक विक्रम

बिहार मध्ये बौद्ध भिक्खून्नी मधुबनी चित्रकला आणि गानकटोरा  सादरीकरणाच्या विविध श्रेणींमध्ये २ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त केली आहेत. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी पाटणा इथं पाटलीपुत्र क्रीडा संकुलात मुख्यमंत्री नितीश कुमार यांना प्रमाणपत्र प्रदान केली. कलाकारांनी पद्मश्री जगदंबा देवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रसिद्ध कलाकार बौआ देवी यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास १९ चौरस मीटरचं मोठं चित्र बनवलं. तर बौद्धगया इथं काल संध्याकाळी ३७५ बौद्ध भिक्खून्नी एकत्र येत गानकटोरा सादरीकरणात विश्व...

October 31, 2024 2:45 PM October 31, 2024 2:45 PM

views 9

अयोध्येत ५५ घाटांवर २५ लाख १२ हजारपेक्षा जास्त पणत्या उजळून सातवा गिनेस विश्वविक्रम

उत्तर प्रदेश सरकारनं काल उत्तर प्रदेशात अयोध्येतल्या ५५ घाटांवर २५ लाख १२ हजारपेक्षा जास्त पणत्या लावून सातवा गिनेस विश्वविक्रम नोंदवला. रामजन्मभूमी मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतरचा हा पहिलाच दीपोत्सव होता. काल शरयूच्या घाटांवर एकाच वेळी १ हजार १२१ बटूंनी आरतीही करून आणखी एक विक्रम केला. अयोध्येतला हा दीपोत्सव फक्त अयोध्या किंवा उत्तर प्रदेशासाठी नव्हे तर संपूर्ण देश आणि जगासाठी उल्लेखनीय आयोजन असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.