January 28, 2025 8:30 PM January 28, 2025 8:30 PM

views 3

जीबीएस रुग्णांच्या उपचारासाठी विशेष व्यवस्था निर्माण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

जीबीएस, अर्थात गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयांमधे विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिल्या आहेत. त्यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आजाराबाबत आढावा घेतला. या आजारावर केले जाणारे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत. अजून काही प्रक्रिया करायची असेल तर सार्वजनिक आरोग्य विभागानं ती करावी, असं त्यांना सांगितलं.   हा आजार दूषित पाण्यामुळे आणि न शिजवलेलं अन्न मांस खाल्यामुळे होतो. त्यामुळे ...

January 28, 2025 9:57 AM January 28, 2025 9:57 AM

views 9

महाराष्ट्रात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे १११ रुग्ण

महाराष्ट्रात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या १११ झाली असून, त्यातले १६ रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर आहेत. राज्यातली ही समस्या हाताळण्यासाठी केंद्र सरकारनं एक उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. सात सदस्यांच्या या समितीमध्ये राष्ट्रीय संसर्गजन्य आजार नियंत्रण संस्था, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था, तसंच राष्ट्रीय विषाणू संस्थेतल्या तज्ञांचा समावेश आहे. ही समिती राज्य सरकारला या आजाराच्या रुग्णांचं व्यवस्थापन आणि नियंत्रण करण्यामध्ये मदत करेल. याचबरोबर राज्य सरकारच्या उपाययोजनांवरही लक्ष ठेवणा...

January 27, 2025 7:08 PM January 27, 2025 7:08 PM

views 8

गुलेन बॅरी सिंड्रोमच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक पुण्यात दाखल

गुलेन बॅरी सिंड्रोम या आजारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक पुण्यात दाखल झालं आहे. या ७ सदस्यीय पथकात राष्ट्रीय संसर्गजन्य आजार नियंत्रण संस्था, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था, तसंच राष्ट्रीय विषाणू संस्थेतल्या तज्ञांचा समावेश आहे.    या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता १०१ झाली आहे. त्यातले ८१ पुणे महापालिका क्षेत्रात, १४ पिंपरी चिंचवड भागात, तर ६ इतर जिल्ह्यांमधले आहेत. याप्रकरणी २५ हजारांहून अधिक घरांची पाहणी महापालिकेनं केली आह...

January 23, 2025 7:23 PM January 23, 2025 7:23 PM

views 10

गुईलेन बॅरे सिंड्रोम आजार संसर्गजन्य नसून नागरिकांनी घाबरू नये – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे शहरात सध्या गुईलेन-बॅरे सिंड्रोम या आजारानं डोकं वर काढलं आहे, मात्र हा संसर्गजन्य आजार नाही, त्यामुळं नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज केलं. याबाबतच्या  आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. गुईलेन-बॅरे सिंड्रोम आजाराची लागण झालेल्यांची संख्या आता ५९ झाली आहे.

January 22, 2025 7:34 PM January 22, 2025 7:34 PM

views 12

पुण्यात ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ या आजाराचे २४ रुग्ण, प्रशासन ॲक्शन मोडवर

पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रात गेल्या दोन आठवड्यांपासून अचानक जीबीएस, अर्थात 'गुलियन बॅरी सिंड्रोम' या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. जीबीएस हा चेतासंस्थेशी संबंधित दुर्मिळ आजार आहे. पुण्यातला सिंहगड रस्ता, धायरी, नऱ्हे, विश्रांतवाडी, पर्वती, कसबा, कोथरूडसह उपनगर आणि ग्रामीण भागात या आजाराची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. २४ रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी काहीजण अतिदक्षता विभागात असून दोन कृत्रिम श्‍वसोच्‍छवास प्रणालीवर आहेत.    या आ...