March 30, 2025 9:02 PM March 30, 2025 9:02 PM

views 7

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात नवीन ८६ हजार ८१४ वाहनांची नोंदणी

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात नवीन ८६ हजार ८१४ वाहनांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३० टक्के वाढ झाली आहे.  यावर्षी  २२ हजार ८१ चार चाकी वाहनांची नोंदणी झाली आहे. ही वाढ सुमारे २८ टक्के आहे. तर ५१ हजार ७५६ नवीन दुचाकी वाहनांची खरेदी नागरिकांनी केली आहे. दुचाकी वाहनांच्या खरेदीत यावर्षी सुमारे २७ टक्के वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त पहिल्या पाच परिवहन कार्यालय अंतर्गत वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे.  त्यामध्ये पुणे परिवहन कार्यालय अंतर्गत ११ हजार ५६, पिंपरी चिंचवड अंतर...

March 30, 2025 3:13 PM March 30, 2025 3:13 PM

views 7

गुढीपाडव्याचा सर्वत्र उत्साह

वर्षप्रतिपदा, अर्थात गुढी पाडव्याचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. रेशमी वस्त्र, कडुनिंब आणि साखरेच्या गाठ्यांच्या माळांनी सजवलेली गुढी घरोघरी उभारुन, तिची पूजा करुन तसंच रांगोळ्या, झेंडूच्या फुलांच्या तोरणांनी सजावट करण्यात आली आहे. राज्यात काही ठिकाणी कडुनिंबाची पानं आणि गूळाचा प्रसाद खाल्ला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे सोनं,  चांदी, इत्यादी मौल्यवान  वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल आहे.  &nbs...

March 30, 2025 2:03 PM March 30, 2025 2:03 PM

views 6

गुढीपाडव्यानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चैत्र शुक्लादी, युगादी, चैती चांद, नवरेह, चेराओबा या सणांनिमित्त देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय नववर्षाची सुरुवात असलेले हे सण भारताची सांस्कृतिक विविधता दर्शवतात आणि सामाजिक एकता वाढवतात असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.    नवीन वर्षाची सुरुवात करणारे हे सण नवता, समृद्धी आणि आशा यांचं प्रतीक असून सर्वांना निसर्गाशी जोडतात असं उपराष्ट्...