November 18, 2024 2:54 PM November 18, 2024 2:54 PM

views 3

जीटी खुल्या तिरंदाजी स्पर्धेत ज्योती वेन्नमला सुवर्ण पदक

लक्झेंबर्ग इथं झालेल्या जीटी खुल्या तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम हिने काल महिलांच्या कम्पाऊंड प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं. ज्योतीने या स्पर्धेत सुरुवातीपासून शानदार खेळाचं प्रदर्शन केलं. बेल्जियमच्या साराह प्रील्स हिच्याविरोधात काल झालेल्या सामन्यात ज्योतीने १४७-१४५ असा विजय मिळवला. दरम्यान, पुरुषांच्या कंपाउंड प्रकारात अभिषेक याने रौप्य पदक मिळवलं.