March 23, 2025 3:14 PM March 23, 2025 3:14 PM

views 18

GST : पात्र करदात्यांसाठी अभय योजना सुरू

जीएसटी कायद्याचं पालन करताना झालेल्या चुकांमुळे करदात्याला भुर्दंड बसू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अभय योजना सुरू केली आहे. पात्र करदात्यांना येत्या ३१ मार्चपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल, असं वस्तू आणि सेवा कर विभागाने कळवलं आहे. जीएसटी कायदा नवीन असल्याने त्याचं पालन करताना किंवा करभरणा करताना करदात्यांकडून चुका झाल्यास किंवा वस्तू आणि सेवा कर संबंधित विवाद प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी या योजनेचा लाभ घेता येऊ शकेल. आवश्यक स्पष्टीकरण किंवा मदतीसाठी आपल्या नोडल, क्षेत्रीय जीएसटी अधिकाऱ...

February 2, 2025 8:12 PM February 2, 2025 8:12 PM

views 15

गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर संकलन एक लाख ९५ हजार कोटी रुपयावर

जानेवारी २०२५ या महिन्यात एक लाख ९५ हजार कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर महसूल जमा झाला आहे. जानेवारी २०२४ च्या तुलनेत या महिन्यात कर महसूलात १२ पूर्णांक ३ दशांश टक्के वाढ झाली आहे. या महिन्यात केंद्राचं वस्तू आणि सेवा कर संकलन ३६ हजार ७७ कोटी रुपये आणि राज्याचं वस्तू आणि सेवा कर संकलन ४४ हजार ९४२ कोटी रुपये इतकं आहे. एकात्मिक वस्तू आणि सेवा कर संकलन १ लाख कोटी रुपये तर उपकर संकलन १३ हजार ४१२ इतकं आहे.

February 2, 2025 1:34 PM February 2, 2025 1:34 PM

views 14

गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर संकलन एक कोटी ९५ लाख रुपये

जानेवारी २०२५ या महिन्यात एक कोटी ९५ लाख रुपये वस्तू आणि सेवा कर महसूल जमा झाला आहे. जानेवारी २०२४ च्या तुलनेत या महिन्यात कर महसूलात १२ पूर्णांक ३ दशांश टक्के वाढ झाली आहे. या महिन्यात केंद्राचं वस्तू आणि सेवा कर संकलन ३६ हजार ७७ कोटी रुपये आणि राज्याचं वस्तू आणि सेवा कर संकलन ४४ हजार ९४२ कोटी रुपये इतकं आहे. एकात्मिक वस्तू आणि सेवा कर संकलन १ लाख कोटी रुपये तर उपकर संकलन १३ हजार ४१२ इतकं आहे.

January 1, 2025 6:56 PM January 1, 2025 6:56 PM

views 62

डिसेंबर महिन्यात जीएसटी संकलन १ लाख ७६ हजार कोटी रुपयांवर

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवाकर संकलन, डिसेंबर महिन्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ७ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांची वृद्धी नोंदवून १ लाख  ७६ हजार कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. डिसेंबर २०२३  मध्ये एकूण जीएसटी संकलन १ लाख ६४ हजार कोटी इतकं होतं.  डिसेंबर २०२४ मध्ये केंद्रीय जीएसटी संकलन ३२ हजार ८३६ कोटी रुपये आणि राज्य जीएसटी संकलन ४० हजार ४९९ कोटी रुपये झालं. एकात्मिक जीएसटी संकलन ४७ हजार ७८३ कोटी रुपये झालं असून उपकर ११ हजार ४७१ कोटी रुपये इतका आहे.

December 26, 2024 10:25 AM December 26, 2024 10:25 AM

views 16

चित्रपटगृहात मिळणाऱ्या पॉपकॉर्नवर जीएसटीमध्ये कोणतीही वाढ नाही

चित्रपटगृहात मिळणाऱ्या पॉपकॉर्नवर वस्तू आणि सेवा कराच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. पाकिटबंद तसंच लेबल लावून विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर १२ टक्के तर सुट्या खाद्यपदार्थांवर ५ टक्के जीएसटी लागू आहे, चित्रपटगृहात मिळणारे पॉपकॉर्न हे सुट्या स्वरुपात विकले जात असल्यानं, त्यावर पाच टक्के दरानेच जीएसटी आकारला जात असल्याचं, जीएसटी परिषदेनं स्पष्ट केलं आहे.

December 2, 2024 1:46 PM December 2, 2024 1:46 PM

views 14

नोव्हेंबर २०२४मध्ये वस्तू आणि सेवा कर संकलनात साडेआठ टक्के वाढ

देशात नोव्हेंबरमध्ये वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी संकलन १ लाख ८२ हजार कोटी रुपये झालं आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत त्यात साडेआठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एकूण १लाख ६८ हजार कोटी रुपये जीएसटी जमा झाला होता. सरकारनं काल ही आकडेवारी जाहीर केली. यंदाच्या नोव्हेंबरमध्ये जमा झालेल्या एकूण जीएसटी मध्ये केंद्रीय जीएसटी संकलन ३४ हजार १४१कोटी रुपये, राज्य जीएसटी ४३ हजार ४७ कोटी रुपये, एकात्मिक जीएसटी ९१ हजार ८२८ कोटी रुपये तर उपकर १३ हजार २५३ कोटी रुपये आहे.

September 9, 2024 8:14 PM September 9, 2024 8:14 PM

views 3

कर्करोगावरची औषधं आणि नमकीन पदार्थांवरच्या जीएसटीमध्ये कपात

कर्करोगावरच्या औषधांवरचा जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर १२ वरुन ५ टक्के करण्याचा निर्णय आज झाला. नमकीन आणि इतर पदार्थांवर १८ टक्क्यांऐवजी १२ टक्के जीएसटी लादण्याचा निर्णय झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. जीएसटी परिषदेच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर त्या बोलत होत्या.  आरोग्य वीम्यावर लादलेला १८ टक्के जीएसटी कमी करण्याची मागणीवर नोव्हेंबरमध्ये निर्णय घेतला जाईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. हा मुद्दा मंत्र्यांच्या समुहाकडे ...

September 2, 2024 1:14 PM September 2, 2024 1:14 PM

views 19

वस्तू आणि सेवा कर संकलनात ऑगस्ट महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के वाढ

  वस्तू आणि सेवा कर संकलनात ऑगस्ट महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एक कोटी ५९ लाख रुपये संकलन झालं होतं, तर यंदा ही रक्कम एक कोटी ७५ लाख रुपये असल्याचं सरकारी आकडेवारी दाखवते.   जीएसटी अंतर्गत करदात्यांना परतावा देण्यापूर्वी केंद्र सरकारने ३० हजार ८६२ कोटी रुपये जमा केले, तर राज्यांनी ३८ हजार ४११ कोटी रुपये जमा केले आहेत. आयात आणि आंतरराज्य विक्रीवरच्या एकात्मिक वस्तू आणि सेवा कराचं संकलन ९३ हजार ६२१ कोटी रुपये इतकं होतं.  

August 2, 2024 2:23 PM August 2, 2024 2:23 PM

views 13

जीएसटी संकलनात जुलै महिन्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत १० पूर्णांक ३ शतांश टक्के वाढ

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवाकर संकलनात जुलै महिन्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत १० पूर्णांक ३ शतांश टक्के वाढ झाली असून ते एक लाख ८२ हजार कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. जुलै महिन्यात करदात्यांचे परतावे दिल्यानंतर वस्तू आणि सेवाकराचं निव्वळ संकलन एक लाख ६० हजार कोटी रुपये इतकं आहे, जे १४ पूर्णांक ४ दशांश टक्क्यांनी वाढलं आहे. वित्त मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार एकूण परताव्यांमध्ये १६ हजार २८३ कोटी रुपयांची घट झाली असून हे प्रमाण १९ पूर्णांक ४ दशांश टक्के इतकं आहे. देशांतर्गत व्यवहारांमध्...

July 31, 2024 3:41 PM July 31, 2024 3:41 PM

views 14

आयुर्विमा आणि आरोग्य विमा योजनेवरचा जीएसटी रद्द करण्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विनंती

आयुर्विमा आणि आरोग्य विमा योजनेवरचा जीएसटी रद्द करण्याची विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून केली आहे. नागपूरच्या आयुर्विमा महामंडळ कर्मचारी संघटनेकडून मिळालेल्या निवेदनानंतर त्यांनी हे पत्र लिहिलं आहे. जीवन विमा आणि वैद्यकीय विम्यावर १८ टक्के जीएसटी दर लागू होतो. जीवन विम्याच्या प्रीमियमवर जीएसटी लादणे म्हणजे जीवनाच्या अनिश्चिततेवर कर लादण्यासारखं असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.