September 12, 2025 2:42 PM September 12, 2025 2:42 PM

views 27

जीएसटी सर्वसामान्यांना उपयुक्त अशा अनेक वस्तूंना करातून सूट

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करातल्या नव्या सुधारणांतर्गत सरकारने सर्वसामान्यांना उपयुक्त अशा अनेक वस्तूंना करातून सूट देऊन एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. या नवीन कररचनेनुसार, काही आवश्यक वस्तूंवरचा जीएसटी शून्य करण्यात आला आहे. यात अति-उच्च तापमानाचं दूध, प्री-पॅकेज अन्नपदार्थ, ब्रँडिंग न केलेले तांदूळ, गहू आणि डाळी तसंच, सर्व प्रकारचे ब्रेड यांचा समावेश आहे. वैयक्तिक आयुर्विमा आणि आरोग्य विम्याच्या हप्त्यालाही जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे. 

September 12, 2025 2:45 PM September 12, 2025 2:45 PM

views 26

जीएसटी सुधारणांमुळे टायर, बॅटरी, काच, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध सहाय्यक उद्योगांना फायदा होणार

वाहन क्षेत्रातल्या जीएसटी सुधारणांमुळे त्यातल्या टायर, बॅटरी, काच, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध सहाय्यक उद्योगांना फायदा होणार आहे. या नव्या सुधारणांनुसार ३५०सीसी पर्यंतच्या बाईक्स, बसेस, चारचाकी गाड्या, १८०० सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमतेचे ट्रॅक्टर आणि विविध सुट्या भागांच्या किंमतीत घट होणार आहे. पर्यायाने वाहन विक्री वाढून त्यामुळे पुरवठा साखळीतल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळणार आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रामुळे उत्पादन, विक्री, वित्तपुरवठा आणि देखभालीसारख्या विविध घटकांमधे प्रत्यक...

September 12, 2025 1:57 PM September 12, 2025 1:57 PM

views 14

जीएसटी करातल्या नव्या सुधारणांतर्गत सरकारने सर्वसामान्यांना उपयुक्त अशा अनेक वस्तूंना करात सूट

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करातल्या नव्या सुधारणांतर्गत सरकारने सर्वसामान्यांना उपयुक्त अशा अनेक वस्तूंना करातून सूट देऊन एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. या नवीन कररचनेनुसार, काही आवश्यक वस्तूंवरचा जीएसटी शून्य करण्यात आला आहे. यात अति-उच्च तापमानाचं दूध, प्री-पॅकेज अन्नपदार्थ, ब्रँडिंग न केलेले तांदूळ, गहू आणि डाळी तसंच, सर्व प्रकारचे ब्रेड यांचा समावेश आहे. वैयक्तिक आयुर्विमा आणि आरोग्य विम्याच्या हप्त्यालाही जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे.

September 10, 2025 2:40 PM September 10, 2025 2:40 PM

views 25

फेररचनेमुळे शेतीसाठी उपयुक्त अनेक वस्तूंवरच्या जीएसटी करात बदल

वस्तू आणि सेवा कर परिषदेनं नुकत्याच केलेल्या फेररचनेमुळे शेतीसाठी उपयुक्त अनेक वस्तूंवरच्या जीएसटी करात बदल झाला आहे.    अन्न, औषधं, शेतीविषयक सामग्री, मत्स्योत्पादन अशा विविध घटकांसह अन्य अनेक क्षेत्रांमध्ये जीएसटी दरात कपात करण्यात आली आहे. बांधकाम क्षेत्रासाठी लागणारे संगमरवर, ग्रॅनाईटसारखे दगड, बांबूपासून बनणाऱ्या फरश्या, विविध प्रकारचे गालिचे, रजया यांवरचा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.   घर सजावटीसाठी लागणारं लाकडी साहित्य, सुशोभनाच्या वस्तू, लाकडी आ...

September 8, 2025 3:00 PM September 8, 2025 3:00 PM

views 31

वस्तू आणि सेवा कर परिषद या कराच्या रचनेत क्रांतिकारी बदल

वस्तू आणि सेवा कर परिषदेने या कराच्या रचनेत नुकतेच क्रांतिकारी बदल केले. वाहतुकीवरचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने वाहन आणि वाहतुकी संदर्भातल्या इतर आवश्यक घटकांवरच्या करात घट केली आहे.   त्यानुसार, १० आणि त्यापेक्षा जास्त आसन संख्या असलेली खासगी वाहनं, बाराशे सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमता असलेली पेट्रोल, एलपीजी किंवा सीएनजी वाहनं तसंच दुहेरी इंधन क्षमतेची वाहनं, पंधराशे सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमता असलेली डिझेलवर चालणारी वाहनं, अद्ययावत रुग्णवाहिकेसाठी लागणारं साहित्य, रिक्षा, वस्तु...

September 7, 2025 3:23 PM September 7, 2025 3:23 PM

views 24

वस्तू आणि सेवा कर परिषदेचे कराच्या रचनेत क्रांतिकारी बदल

वस्तू आणि सेवा कर परिषदेने या कराच्या रचनेत नुकतेच क्रांतिकारी बदल केले.  पुढच्या पिढीचं भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं लहान मुलांच्या वापरातल्या विविध वस्तूंवरच्या करात कपात करण्यात आली आहे. त्यात बालकांना दूध पाजण्याच्या बाटल्या, निपल्स, डायपर्स, लहान मुलांची खेळणी, विशेषतः देशातल्या हस्तकला कारागीरांनी बनवलेल्या बाहुल्या, इत्यादींवर १२ टक्के ऐवजी ५ टक्के कर राहणार आहे.  पेन्सिल शार्पनर आणि खोडरबर यांच्यावरचा कर शून्य टक्के झालाय तर शालेय वह्या पुस्तकं, प्रयोगवह्या, ग्राफ वह्या, नकाशे, अध...

September 7, 2025 8:16 PM September 7, 2025 8:16 PM

views 15

वस्तू आणि सेवा कर-जी.एस.टी.च्या नव्या दरांचा कृषी क्षेत्राला मोठा लाभ होईल – शिवराज सिंह चौहान

वस्तू आणि सेवा कर-जी.एस.टी.च्या नव्या दरांचा कृषी क्षेत्राला मोठा लाभ होईल असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी  केलं आहे. भोपाळ इथं काल पत्रकार परिषदेत बोलताना चौहान यांनी या बदलांचा विशेषतः लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला. शेतीचा खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांचा नफा वाढेल, असंही ते म्हणाले.

August 23, 2025 12:37 PM August 23, 2025 12:37 PM

views 20

५६वी जीएसटी परिषद येत्या ३ आणि ४ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणार

जीएसटी परिषदेची ५६वी बैठक येत्या ३ आणि ४ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील.   जीएसटीमधला १२ आणि २८ टक्क्यांचा टप्पा हटवण्याचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरच्या भाषणात यासंबंधीचे संकेत दिले होते.

July 1, 2025 1:01 PM July 1, 2025 1:01 PM

views 6

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर प्रणालीला आज आठ वर्ष पूर्ण

वस्तू आणि सेवा कर प्रणालीला आज आठ वर्षं पूर्ण झाली. आर्थिक एकात्मता आणि कर सुधारणांच्या दिशेनं एक मोठा बदल म्हणून २०१७ मध्ये GST प्रणाली लागू करण्यात आली. त्यामुळे भारतातील अप्रत्यक्ष करांची मालिका एकात्मिक प्रणालीत रूपांतरित झाली. जीएसटीने कर अनुपालन सोपे केले असून व्यवसायांसाठी खर्च कमी केला आहे. तसंच राज्यांमध्ये वस्तूंची अखंड वाहतूक सुनिश्चित केली आहे. देशातील वस्तू आणि सेवा कराचे दर जीएसटी परिषदेद्वारे निश्चित केले जातात, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेश सरकारांचे प्रतिनिध...

March 23, 2025 3:20 PM March 23, 2025 3:20 PM

views 13

अकोला : शेतीच्या वस्तूंवरचा GST कर रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी

रासायनिक खतं, कीटकनाशकं, शेतीची  औजारं यांच्यासह शेतीसाठीच्या आवश्यक वस्तूंवरचा जीएसटी कर रद्द करावा, किंवा त्याचा परतावा द्यावा अशी मागणी अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषीसंबंधी वस्तूंवर ५ ते २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर आकारला जातो, त्यामुळे  शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात हेक्टरी जवळपास १५ हजारांची वाढ झाली असल्याचा शेतकऱ्यांचा दावा असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.