October 21, 2025 12:54 PM October 21, 2025 12:54 PM

views 175

GST Reforms : देशाच्या वाहन क्षेत्राला बळकटी

वस्तू आणि सेवा करातल्या कपातीमुळे गेल्या महिन्यात २२ तारखेपासून जीएसटी बचत उत्सवाला सुरुवात झाली आहे. त्याचा फायदा समाजातल्या सर्व घटकांना होत आहे. जीएसटी बचत उत्सवाचा देशाच्या वाहन क्षेत्राला बळकटी देण्यात किती महत्त्वाचा वाटा आहे.   सरकारने वाहन क्षेत्रासाठी जारी केलेल्या नव्या जीएसटी दरांनुसार, अठराशे सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या ट्रॅक्टरवर ५ टक्के तर अठराशे सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या ट्रॅक्टरवर १८ टक्के कर आकारला जातो. तसंच, टायर आणि गिअर्स सारख्या ट्रॅक्टर निर्मितीम...

October 20, 2025 3:08 PM October 20, 2025 3:08 PM

views 49

GST Reforms : जाणून घ्या, घर खरेदी क्षेत्रातला बदल…

२२ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या जीएसटी बचत उत्सवाचा फायदा समाजाच्या सर्व घटकांना होत आहे. आज जाणून घेऊ या जीएसटी सुधारणांमुळे घर खरेदी क्षेत्रात झालेल्या बदलांबद्दल…   जीएसटी प्रणालीतल्या सुधारणांमुळे घर बांधणीसाठीची सामग्री आणि पर्यायाने एकंदर खर्च कमी होऊन या क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे. सिमेंटवरचा कर २८ टक्क्यावरून १८ टक्क्यावर आल्यामुळे घरं आणि पायाभूत सुविधा उभारण्याचा खर्च कमी झाला आहे. संगमरवर आणि ग्रॅनाइटच्या ब्लॉक्सवरचा जीएसटी १२ टक्क्यावरून ५ टक्क्यावर आला आहे. तसंच विटांवरही आता ५...

October 18, 2025 7:46 PM October 18, 2025 7:46 PM

views 170

जीएसटी कपातीमुळे बाजारपेठेतली उलाढाल २० लाख कोटी रुपयांनी वाढण्याचा सरकारचा अंदाज

वस्तू आणि सेवा कराच्या दरांमध्ये केलेल्या कपातीमुळं यंदाच्या वर्षी देशात ग्राहकांकडून होणारी खरेदी १० टक्के म्हणजे २० लाख कोटी रुपयांनी वाढेल असा अंदाज सरकारनं व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, पीयूष गोयल आणि अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेला संबोधित केलं.   जीएसटीतल्या सुधारणांमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळाली असून सणासुदीच्या काळात इलेक्ट्रॉनिक्स, वाहनं आणि ग्राहकोपयोगी वस्तूंची मोठी खरेदी झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन...

October 5, 2025 7:56 PM October 5, 2025 7:56 PM

views 100

GST Reforms : जम्मू काश्मीरमधे होणाऱ्या परिणामाविषयी जाणून घ्या…

वस्तू आणि सेवा परिषदेनं जीएसटी कररचनेत केलेल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत. आज ऐकूया जम्मू काश्मीरमधे होणाऱ्या याच्या परिणामाविषयी…   नव्या जीएसटी सुधारणांमुळे जम्मू-काश्मीरमधल्या हस्तकला, शेती, पर्यटन आणि विशेष उत्पादनांच्या स्पर्धात्मकतेत वाढ होणार आहे. जीएसटीमधली ही करकपात जम्मू-काश्मीरच्या विविध क्षेत्रांमधल्या औद्योगिक विकासासाठी, पर्यटनवाढीसाठी आणि ग्रामीण जीवनाच्या उन्नतीसाठी सहाय्यभूत ठरणार आहे. भरतकाम, शाली, लाकडी कोरीव काम, दागिने, रेशमी गालिचे यांसारख्या कलाकृती आणि हस्...

October 5, 2025 3:37 PM October 5, 2025 3:37 PM

views 64

GST Reforms : वस्त्रोद्योगाविषयी जाणून घ्या…

वस्तू आणि सेवा परिषदेने जीएसटी कररचनेत केलेल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत. यामुळे समाजातल्या सर्व घटकांना लाभ झाला आहे. वस्त्रोद्योग उद्योगाविषयी जाणून घ्या...   सामान्य माणसावरचा भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारने वस्त्रोद्योगावरचा जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या कररचनेनुसार हस्तनिर्मित धाग्यांवरील जीएसटी १८ टक्क्यावरून ५ टक्के करण्यात आला आहे.  याशिवाय अडीच हजारांपेक्षा कमी किमतीच्या रेडिमेड कपड्यांवरील जीएसटी ५ टक्के झाला आहे. यामुळे सर्वसामान्यांना विविध फॅशनचे कपड...

October 3, 2025 12:52 PM October 3, 2025 12:52 PM

views 86

GST Reforms : छोट्या कार आणि दुचाकींवर जीएसटी किती?

जीएसटी करप्रणालीतल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या असून त्याचा फायदा समाजाच्या सर्व घटकांना होत आहे. अप्रत्यक्ष करप्रणाली सुलभ करण्याच्या दृष्टीनं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. जाणून घेऊया छोट्या कार आणि दुचाकींवरच्या कमी झालेल्या जीएसटीबद्दल… जीएसटी प्रणालीत झालेल्या सुधारणांअंतर्गत छोट्या कारवरचा जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के इतका झाला आहे. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांवरचा आर्थिक तणाव कमी होऊन छोटी शहरं आणि गावांमध्ये छोट्या कारच्या खरेदीला चालना मिळेल. याशिवाय, ३५० सीसीपर्यंतच्या दुचाकी...

October 2, 2025 3:54 PM October 2, 2025 3:54 PM

views 65

कृषी यंत्रसामग्रीवरचा जीएसटी ५ टक्के

वस्तु आणि सेवा कररचनेतल्या सुधारणांमुळे कृषी यंत्रसामग्रीवरचा जीएसटी कमी करून १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आला आहे. जैव-कीटकनाशकं तुषार सिंचन, ठिबक सिंचन प्रणाणी, कापणीसाठीची यंत्र, लहान आकाराचं डिझेल इंजिन यांचा त्यात समावेश आहे. अमोनिया, सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड यांसारख्या खतांवरचा जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.

October 1, 2025 1:44 PM October 1, 2025 1:44 PM

views 53

शैक्षणिक साहित्याबाबत केलेल्या कर सुधारणांविषयी जाणून घ्या…

वस्तू आणि सेवा कररचनेतल्या सुधारणा २२ तारखेपासून लागू झाल्या आहेत. त्यात शैक्षणिक साहित्याबाबत केलेल्या कर सुधारणांविषयी आज जाणून घेऊया.   विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावं यासाठी सरकारने शैक्षणिक साहित्यावरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वही, ग्राफबुक, शार्पनर आणि पेन्सिल यांच्यावरील १२ टक्के जीएसटी कमी करून तो पाच टक्के करण्यात आला आहे. तसंच खोडरबरवरचा ५ टक्के जीएसटी रद्द करून तो शून्य करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कंपास पेटी, कलर बॉक्स यांच्यावर...

September 30, 2025 1:28 PM September 30, 2025 1:28 PM

views 47

GST Reforms : क्रीडा साहित्यांवर केलेल्या कर सुधारणांविषयी जाणून घ्या…

वस्तू आणि सेवा कररचनेतल्या सुधारणा २२ तारखेपासून लागू झाल्या आहेत. त्यात क्रीडा साहित्याबाबत केलेल्या कर सुधारणांविषयी आज जाणून घेऊया…   केंद्रसरकारने वस्तू आणि सेवा करामध्ये केलेल्या सुधारणांमध्ये खेळणी आणि क्रीडा साहित्यावरचा वस्तू आणि सेवा कर १२ टक्क्यांवरुन ५ ट्क्क्यांवर आणला आहे.  या सुधारणेमुळे ग्राहक आणि क्रीडा सहित्य विक्रेत्यांना दिलासा तर मिळेलच तसंच स्वदेशी खेळण्यांच्या उद्योगालाही चालना मिळेल. खेळण्यांवरचा जीएसटी कमी केल्यामुळे मुलांना खेळाला प्रोत्साहन मिळेल. खेळण्याचे स्वदेशी उत्पा...

September 29, 2025 1:14 PM September 29, 2025 1:14 PM

views 67

खाद्य पदार्थ्यांवर जीएसटी कमी, ग्राहकांना दिलासा

वस्तू आणि सेवा कररचनेतल्या सुधारणा २२ तारखेपासून लागू झाल्या आहेत. त्यात खाद्य पदार्थांबाबत केलेल्या कर सुधारणांविषयी जाणून घेऊया…   अनेक खाद्य पदार्थ्यांवरील जीएसटी कमी करून सरकारने ग्राहकांना दिलासा दिला आहे. पिझ्झा ब्रेड, खाकरा आणि चपाती या पदार्थ्यांना नव्या कररचनेनुसार करमुक्त करण्यात आलं आहे. तसंच पराठा आणि परोटा हे पदार्थही करमुक्त झाले आहेत. यामुळे या पदार्थांचा दर कमी होणार असून सर्वसामान्यांच्या खिशावरील ताणही कमी होणार आहे.  सॉसेज, करी पेस्ट, मायोनीज आणि मसाल्यांवरील कर १२ टक्क्यावरून...