September 8, 2025 3:00 PM September 8, 2025 3:00 PM

views 29

वस्तू आणि सेवा कर परिषद या कराच्या रचनेत क्रांतिकारी बदल

वस्तू आणि सेवा कर परिषदेने या कराच्या रचनेत नुकतेच क्रांतिकारी बदल केले. वाहतुकीवरचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने वाहन आणि वाहतुकी संदर्भातल्या इतर आवश्यक घटकांवरच्या करात घट केली आहे.   त्यानुसार, १० आणि त्यापेक्षा जास्त आसन संख्या असलेली खासगी वाहनं, बाराशे सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमता असलेली पेट्रोल, एलपीजी किंवा सीएनजी वाहनं तसंच दुहेरी इंधन क्षमतेची वाहनं, पंधराशे सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमता असलेली डिझेलवर चालणारी वाहनं, अद्ययावत रुग्णवाहिकेसाठी लागणारं साहित्य, रिक्षा, वस्तु...

September 7, 2025 8:00 PM September 7, 2025 8:00 PM

views 20

जीएसटी करसुधारणांमुळे ई-कॉमर्स क्षेत्राअंतर्गत ऑनलाइन खरेदी स्वस्त होणार

नुकत्याच झालेल्या वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आता ५ टक्के आणि १८ टक्के अशी द्विस्तरीय कर व्यवस्था असेल, तसंच उपकर व्यवस्था संपुष्टात आणली जाणार असल्याची घोषणा केली. या सुधारणांमुळे ई-कॉमर्स क्षेत्राअंतर्गत ऑनलाइन खरेदी स्वस्त होणार असून, त्यामुळे उद्योग व्यवसायांना अधिक स्पर्धात्मक बनायलाही मदत होणार आहे.     या सुधारणांमुळे आता पुठ्ठे, खोके, ट्रे आणि वेष्टणासाठी वापरला जाणारा कागद अशा पॅकेजिंग साहित्याचा खर्च कमी होणार आहे. सोबतच वस्तू आणि सेवा कर कमी होऊन के...

February 2, 2025 8:12 PM February 2, 2025 8:12 PM

views 14

गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर संकलन एक लाख ९५ हजार कोटी रुपयावर

जानेवारी २०२५ या महिन्यात एक लाख ९५ हजार कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर महसूल जमा झाला आहे. जानेवारी २०२४ च्या तुलनेत या महिन्यात कर महसूलात १२ पूर्णांक ३ दशांश टक्के वाढ झाली आहे. या महिन्यात केंद्राचं वस्तू आणि सेवा कर संकलन ३६ हजार ७७ कोटी रुपये आणि राज्याचं वस्तू आणि सेवा कर संकलन ४४ हजार ९४२ कोटी रुपये इतकं आहे. एकात्मिक वस्तू आणि सेवा कर संकलन १ लाख कोटी रुपये तर उपकर संकलन १३ हजार ४१२ इतकं आहे.

December 22, 2024 1:09 PM December 22, 2024 1:09 PM

views 9

पोषणयुक्त तांदळावरील कराचा दर कमी करण्याची जीएसटी परिषदेची शिफारस

जीएसटी परिषदेनं पोषणयुक्त तांदळावरील कराचा दर कमी करून पाच टक्के करण्याची आणि पाकिटबंद तसंच लेबल केलेल्या वस्तूंच्या व्याख्येत सुधारणा करण्याची शिफारस केली आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेची ५५वी बैठक काल राजस्थानमध्ये जैसलमेर इथं झाली. वस्तू आणि सेवा कराशी संबंधित अनेक निर्णय या बैठकीत घेण्यात आले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि वित्त मंत्रालयाचे अधिकारी सहभागी झाले होते. बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना...