December 1, 2025 7:51 PM December 1, 2025 7:51 PM
14
GST संकलनात यंदा सात दशांश टक्क्यांची वाढ नोंदवत, १ लाख ७० हजार कोटी रुपयांवर
देशभरातलं वस्तू आणि सेवा कर संकलन गेल्यावर्षी नोव्हेंबरच्या तुलनेने यंदा सात दशांश टक्क्यांनी वाढून १ लाख ७० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात जीएसटी महसूल १ कोटी ६९ लाख कोटी रुपये इतका होता. तर ऑक्टोबरमध्ये केंद्राचा जीएसटी महसूल ३४ हजार ८४३ कोटी आणि राज्याचा जीएसटी महसूल ४२ हजार ५२२ कोटी रुपये इतका जमा झाला होता.