March 25, 2025 3:30 PM March 25, 2025 3:30 PM

views 6

ग्रीनलँडचे प्रधानमंत्री म्यूट बी. एगेडे यांची अमेरिकेच्या नियोजित दौऱ्यावर टीका

ग्रीनलँडचे प्रधानमंत्री म्यूट बी. एगेडे यांनी अमेरिकेच्या नियोजित दौऱ्यावर टीका केली आहे. अमेरिका हा दौरा ग्रीनलँडवर जबरदस्तीने दबाव टाकण्यासाठी करत असल्याचं एगेडे यांनी म्हटलं आहे.  ट्रम्प प्रशासनाच्या ग्रीनलँडच्या नियोजित दौऱ्याचे नेतृत्व उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या पत्नी उषा व्हान्स, व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्ट्झ आणि ऊर्जा सचिव ख्रिस राईट करतील. आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अमेरिकेच्या शिष्टमंडळाचा ग्रीनलँड दौरा खूप महत्त्वाचा असून हा दौरा मैत्रीपूर्ण असल...

March 14, 2025 1:48 PM March 14, 2025 1:48 PM

views 8

ग्रीनलँड ताब्यात घेता येईल, अमेरिकेच्या अध्यक्षांना विश्वास

डेन्मार्कचा स्वायत्त भाग असलेल्या ग्रीनलँडला अमेरिका अधिग्रहित करू शकेल असा आपला विश्वास असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. नाटो चे महासचिव मार्क रुट यांच्याशी काल व्हाईट हाऊस मध्ये झालेल्या बैठकीत ते बोलत होते. अमेरिका ग्रीनलँड या बेटाला अधिग्रहित करु शकेल आणि या कामी नाटोचे प्रमुख महत्वाची भूमिका बजावू शकतील, असं ट्रम्प म्हणाले.    ग्रीनलँडमध्ये आधीपासूनच अमेरिकी सैन्य असून यापुढे तिथं अधिक अमेरिकी सैनिक असतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र ग्रीनलँड...

March 12, 2025 2:59 PM March 12, 2025 2:59 PM

views 9

ग्रीनलँडच्या संसदीय निवडणुकीत डेमोक्रेटीट पक्षाची २९.९ टक्क्यांनी आघाडी

ग्रीनलँडच्या संसदीय निवडणुकीत डेमोक्रेटीट या पक्षानं २९ पूर्णांक ९ दशांश टक्के मतांसह बाजी मारली आहे. आर्क्टिक खंडावर वर्चस्व स्थापन करण्यासाठी अमेरिका-चीन-रशिया यांच्यात चढाओढ सुरु असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या भागाचा ताबा घेण्याचा मानस जाहीर केला त्यामुळे या निवडणुकीकडे साऱ्या जगाचं लक्ष होतं. ग्रीनलँड हा डेन्मार्कच्या स्वामित्वाखालचा स्वायत्त प्रदेश असून डेन्मार्कपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळवण्याकडे सर्व राजकीय पक्षांची वाटचाल सुरु आहे.  ग्रीनलँडच्या अंतर्गत सुरक्षा, सं...