August 28, 2024 6:56 PM August 28, 2024 6:56 PM
10
१२ नव्या ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट सिटींना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमा अंतर्गत बारा नव्या ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट सिटींना केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांन नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. यासाठी अंदाजे २८ हजार ६०२ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून यामुळे दहा लाख थेट आणि ३० लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल, असं वैष्णव यांनी सांगितलं. हे प्रकल्प दहा राज्यांमध्ये राबवले जात आहेत. यात महाराष्ट्रातलं दिघी, उत्तराखंडमधलं खुरपिया, बिहारमध...