November 16, 2025 6:32 PM November 16, 2025 6:32 PM
23
जागतिक मुष्टियुद्ध चषक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताच्या चारही स्पर्धकांची उपांत्य फेरीत धडक
ग्रेटर नॉयडा इथं सुरू असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध चषक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताच्या चारही स्पर्धकांनी उपांत्य फेरीत धडक मारली. महिलांच्या ४८ किलो वजनी गटात मीनाक्षी हिनं, तर ५८ किलो वजनी गटात प्रीती यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात केली. पुरुषांच्या स्पर्धेत ८० किलो वजनी गटात अंकुश आणि ९० किलो वजनावरच्या गटात नरेंद्र यांनी उत्तम कामगिरी करत उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं.