September 14, 2025 8:21 PM

views 6.2K

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांचा शपथविधी

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, हे उद्या महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतील. उद्या सकाळी ११ वा. त्यांचा शपथविधी होईल. या शपथविधी समारंभासाठी त्यांचं आज मुंबईत आगमन झालं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर त्यांचं स्वागत केलं. त्यांना रेल्वे पोलिसांच्या वतीनं आणि त्यानंतर राजभवनात पोहोचल्यावर मुंबई पोलिसांच्या वतीनं मानवंदनाही देण्यात आली.   सी.पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदावर निवड झाल्यानंतर ते महाराष्ट्राच्या...

June 27, 2025 9:46 AM

views 58

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवन इथं, पोलिस दलातील पदक अलंकरण सोहळा संपन्न

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते काल राजभवन इथं, पोलिस दलातील पदक अलंकरण सोहळा झाला. यावेळी राष्ट्रपतींनी 2021 आणि 2022 या दोन वर्षांच्या स्वातंत्र्य दिनी जाहीर केलेली पोलीस पदकं प्रदान केली. 41 पोलीस अधिकारी आणि जवानांना पोलीस शौर्य पदकं, 3 पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक, तर 39 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकं प्रदान करण्यात आली.

February 5, 2025 7:17 PM

views 57

वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी अथवा इतर व्यावसायिक शिक्षणाला कलेची जोड दिली गेली पाहिजे – राज्यपाल सी पी राधाकृष्णन

कला हा इतर प्रत्येक विषयाला समृद्ध करणारा विषय असून कला विषयामुळे जाणिवा विस्तारतात. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी अथवा इतर व्यावसायिक शिक्षणाला कलेची जोड दिली गेली पाहिजे, असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं. राज्य शासनाच्या कला संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचं उद्घाटन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत काल जहांगीर कलादालन इथे संपन्न झालं ,त्यावेळी ते बोलत होते.   यावेळी ज्येष्ठ अमूर्त चित्रकार लक्ष्मण श्रेष्ठ यांना राज...

February 5, 2025 7:15 PM

views 28

कृषीप्रधान संस्कृती आणि सर्वाधिक लोकसंख्यांक लोकशाही जपण्याची सामूहिक जबाबदारी सर्वच क्षेत्रांची असली तरी सर्वाधिक टक्का असणाऱ्या कृषी क्षेत्रावर आणि पर्यायानं कृषी पदवीधरांवर ती जास्त आहे – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

कृषीप्रधान संस्कृती आणि सर्वाधिक लोकसंख्यांक लोकशाही जपण्याची सामूहिक जबाबदारी सर्वच क्षेत्रांची असली तरी सर्वाधिक टक्का असणाऱ्या कृषी क्षेत्रावर आणि पर्यायानं कृषी पदवीधरांवर ती जास्त आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते अकोला इथं डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३९ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. संपूर्ण विश्वाचं उदरभरण करण्याची क्षमता भारतीय कृषिक्षेत्रात आहे, असं ते म्हणाले. शाश्वत ग्रामविकासासाठी कृषी विद्यापीठांनी मध्यवर्ती भूमिका बजावावी, असं आवाहन राज्...

November 30, 2024 7:08 PM

views 52

एनसीसीमध्ये मुलींचा सहभाग वाढला पाहिजे – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते आज मुंबईत के सी महाविद्यालयात ‘एनसीसीच्या माध्यमातून कॅडेट मुलींचे सक्षमीकरण’ या विषयावरच्या चर्चासत्रचं उद्घाटन झालं. या सत्रात त्यांनी योग आणि ध्यानधारणेचं महत्त्व विशद करत एनसीसी मध्ये मुलींचा सहभाग वाढला पाहिजे अशी आशा व्यक्त केली. यामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढून नेतृत्व गुणांचा विकास होतो असं ते म्हणाले. या प्रसंगी एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल सिंह, सैन्यलातले अधिकारी, जवान आणि एन सी सी कॅडेट्स उपस्थित होते.

September 28, 2024 7:07 PM

views 52

मतदारांना निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिकसहभागी होण्याचं निवडणूक आयोगाचं आवाहन

राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनाही सहभागी व्हावं आणि मतदानाची टक्केवारी वाढवावी असं आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगानं आज मुंबईत केलं. त्यासाठी विविध शहरांमध्ये विशेष मोहिम राबवली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर मुंबईत वार्ताहर परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली. मतदान केंद्रावर मतदारांना अधिकाधिक सुविधा देण्यात याव्या असे आदेश दिले आहेत. त्यासाठी एका मतदान केंद्रावर सरासरी ९५० मतदार असतील याची काळजी घेतल्याचं त्यांनी सांगि...

August 4, 2024 2:56 PM

views 59

सरकारी योजनांचे फायदे तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचावेत, याकरता राज्यपालांनी पुढाकार घ्यावा – राष्ट्रपती

राज्यपालांच्या दोन दिवसीय परिषदेचा काल राष्ट्रपती भवनात समारोप झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकमेकांच्या अनुभवातून शिकण्याच्या भावनेनं सर्वसमावेशक चर्चा करण्याच्या राज्यपालांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं. सरकारी योजनांचे फायदे तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचावेत, विशेषतः अनुसूचित जाती- जमाती आणि आदिवासींना या योजनांचा लाभ मिळावा याकरता राज्यपालांनी पुढाकार घ्यावा असं त्यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात सांगितलं. आदर्श राज्याचा वस्तुपाठ प्रस्थापित करणं ही राज्यपालांची जबाबदारी असून प्रभावी ...

August 2, 2024 10:23 AM

views 53

प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत राज्यात १ कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ पीकविमा अर्ज दाखल

प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत राज्यात १ कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ पीकविमा अर्ज दाखल झाल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. दरम्यान, राज्यात जुलै अखेर सुमारे ९७ टक्के पेरणी पूर्ण झाली असून पीकविमा योजनेच्या माध्यमातून १ कोटी १० लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आलं आहे.

July 31, 2024 6:56 PM

views 42

राज्याचे नवे राज्यपाल म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांचा शपथविधी

राज्याचे नवे राज्यपाल म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी आज शपथ घेतली. मुंबईत राजभवनात आयोजित समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजीत पवार यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांचं स्वागत केलं.   सी. पी. राधाकृष्णन याआधी झारखंडचे राज्यपाल होते. तमिळनाडूमधे भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं होतं. कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडू...

July 30, 2024 8:37 PM

views 57

राज्याचे मावळते राज्यपाल रमेश बैस यांना निरोप

राज्याचे मावळते राज्यपाल रमेश बैस यांना आज निरोप देण्यात आला. राजभवनात झालेल्या या निरोप सभारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार, तसंच राजभवनातले अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.       नवनियुक्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचा शपथविधी समारंभ उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता राजभवनात होणार आहे.