December 10, 2024 1:32 PM

views 10

जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त राजभवनात विशेष कार्यक्रमाचं आयोजन

जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन इथं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. निवृत्त न्यायमूर्ती एन. एच. पाटील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्य मानवाधिकार आयोगाच्या वर्ष २०२४च्या स्मरणिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झालं. यानंतर सात विविध अतिसंवेदनशील घटकांच्या अधिकारांवर प्रकाश टाकणाऱ्या सत्रांचं आयोजन या कार्यक्रमात केलं आहे. पद्मश्री शंकर पापळकर ...

December 6, 2024 7:23 PM

views 10

विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉनला राज्यपालांच्या हस्ते हिरवा झेंडा

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज मुंबईत कुलाबा इथल्या शहीद स्मारकात विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. १६ डिसेंबरला साजऱ्या होणाऱ्या ५४व्या विजय दिनानिमित्त लष्कराच्या महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्र मुख्यालयांनी ही मॅरेथॉन आयोजित केली आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले  सैन्य दलातले धावपटू ६ ते १६ डिसेंबर दरम्यान मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि पुणे असं ४०५ किमी अंतर पार करणार आहेत. या कालावधीत 'जाणूया सैन्य दलांना' 'सैन्य दलात महिलांना समान संधी' या विषयावर प...

October 18, 2024 9:46 AM

views 14

हरित ऊर्जा हा भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या धोरणाचा महत्त्वाचा घटक – राज्यपाल

‘हरित ऊर्जा’ हा भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या धोरणाचा महत्त्वाचा घटक असल्याचं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. जागतिक व्यापार केंद्राच्या मुंबई विभागानं आयोजित केलेल्या, 'शाश्वत विकासासाठी हरित आणि नवीकरणीय ऊर्जा' या विषयावरच्या जागतिक व्यापार प्रदर्शनात बोलत होते. महाराष्ट्र राज्य, सौरऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनं आणि बायोएनर्जी यासारख्या क्षेत्रांमध्ये आघाडीवर असल्याचं ते यावेळी म्हणाले.

October 8, 2024 9:50 AM

views 14

नाशिकमध्ये लवकरच आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

नाशिकमध्ये लवकरच आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल अशी घोषणा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काल पालघर जिल्ह्यात बोलताना केली. जव्हारमध्ये आयोजित पेसा ग्रामसभा महासंमेलनात ते बोलत होते. आदिवासी विद्यापीठाअंतर्गत, आंतरराष्ट्रीय दर्जाचं वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्यात येईल, यामध्ये जास्तीत जास्त जागा आदिवासी समुदायातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील असं ते म्हणाले.