July 8, 2025 6:43 PM July 8, 2025 6:43 PM

views 11

आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातीतल्या अधिक गरजू युवकांना घेऊ द्यावा- राज्यपाल

अनुसूचित जातीतल्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी गुणवत्तेवर प्रवेश आणि नोकऱ्या मिळवण्याचा प्रयत्न करावा, आणि आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातीतल्या अधिक गरजू युवकांना घेऊ द्यावा, असं आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते आज मुंबईत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ८० व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते. आरक्षण ही विकासाची किल्ली आहे, मात्र विद्यार्थी आणि युवकांनी आता जागतिक स्तरावर स्पर्धेसाठी तयार राहिलं पाहिजे, असं ते म्हणाले. यावेळी राज्यपालांच्या हस्...

June 27, 2025 9:46 AM June 27, 2025 9:46 AM

views 17

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवन इथं, पोलिस दलातील पदक अलंकरण सोहळा संपन्न

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते काल राजभवन इथं, पोलिस दलातील पदक अलंकरण सोहळा झाला. यावेळी राष्ट्रपतींनी 2021 आणि 2022 या दोन वर्षांच्या स्वातंत्र्य दिनी जाहीर केलेली पोलीस पदकं प्रदान केली. 41 पोलीस अधिकारी आणि जवानांना पोलीस शौर्य पदकं, 3 पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक, तर 39 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकं प्रदान करण्यात आली.

May 7, 2025 3:51 PM May 7, 2025 3:51 PM

views 13

गडचिरोलीत खनिकर्मविषयक अभ्यासक्रमासाठी गोंडवाना विद्यापीठाचे परदेशी विद्यापीठांबरोबर करार

खनिजसंपन्न गडचिरोली जिल्ह्यात खनिकर्म विषयाचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत. स्वायत्त 'विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था' स्थापन करण्याबाबत गडचिरोलीचं गोंडवन विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियाचं कार्टीन विद्यापीठ यांच्यात आज यासंदर्भातल्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. मुंबईत राजभवन इथं राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार झाला. 

March 31, 2025 8:48 PM March 31, 2025 8:48 PM

views 8

समुद्र मार्गाने होणारा व्यापार हा भारतीय व्यापार तसेच अर्थव्यवस्थेचा कणा-राज्यपाल

समुद्र मार्गाने होणारा व्यापार हा भारतीय व्यापार तसेच अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे वर्ष  २०४७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी सागरी क्षेत्राचा समग्र विकास होणे अतिशय आवश्यक आहे,  असं राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. सागरी व्यापार क्षेत्रातर्फे साजरा केल्या जाणाऱ्या ६२ व्या  राष्ट्रीय सागरी दिवसाचे तसेच मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उदघाटन राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन इथं  झालं, त्यावेळी ते बोलत होते.

March 8, 2025 8:45 PM March 8, 2025 8:45 PM

views 8

बचतगटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था अधिक बळकट होत आहे- राज्यपाल

बचतगटांच्या माध्यमातून महिला उद्यमशील बनत असून ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था अधिक बळकट होत आहे, असं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. जागतिक महिला दिनानिमित्त ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ कार्यक्रमाचा राज्यस्तरीय दशकपूर्ती समारंभ  आणि कन्यारत्न  सन्मान कार्यक्रम आज  राजभवन इथं झाला,  त्यावेळी ते  बोलत होते. महिलांच्या योगदानाशिवाय देशाचा विकास होणं शक्य नाही. वर्ष २०२९ पर्यंत राजकीय क्षेत्रात मिळणाऱ्या आरक्षणामुळे महाराष्ट्र हे ‘महिला राज्य’ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन...

March 7, 2025 8:01 PM March 7, 2025 8:01 PM

views 16

बेल्जियमच्या राजकुमारी अ‍ॅस्ट्रिड यांनी घेतली राज्यपाल यांची भेट

भारत भेटीवर आलेल्या बेल्जियमच्या राजकुमारी अ‍ॅस्ट्रिड यांनी आज राज्यपाल सी. पी.  राधाकृष्णन यांची मुंबईल्या राजभवनात भेट घेतली. या भेटीत त्यांनी दोन्ही देशातले उद्योग, व्यापार हरित ऊर्जा, पर्यटन आणि सांस्कृतिक क्षेत्रातले संबंध वाढवण्याबाबत चर्चा केली.  या वेळी बेल्जियमचं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही उपस्थित होतं. 

February 24, 2025 3:21 PM February 24, 2025 3:21 PM

views 14

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या दिक्षांत समारंभात राज्यपालांची हजेरी

भारतामध्ये २०३६ पर्यंत उच्च शिक्षणासाठीच्या नोंदणीत ५० टक्के वाढ करण्याचं  स्वप्न फक्त मुक्त आणि दूरस्थ शिक्षण क्षमतेचा वापर करूनच साकारता येईल, असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज नाशिक इथं केलं. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या दिक्षांत समारंभात ते बोलत होते. देशातील शैक्षणिक प्रणाली लवकरच परीक्षा केंद्रित मॉडेलपासून परिणाम आधारित मॉडेलकडे संक्रमण करणार आहे. हा बदल विद्यार्थ्यांना अधिक रोजगारक्षम बनवण्याबरोबरच त्यांना उद्योजक बनण्यासाठी  सक्षम करेल आणि  २०४७ पर्यंत ...

January 26, 2025 8:40 PM January 26, 2025 8:40 PM

परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन

परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात आणि इतर  सर्वच बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन सरकारी कामकाज अधिक गतिमान करता येईल, असं ते म्हणाले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर राज्य पोलीस दल आणि इतर सुरक्षा दलांच्या संचलनाची मानवंदना राज्यपालांनी स्वीकारली.    मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, दक...

January 22, 2025 7:39 PM January 22, 2025 7:39 PM

views 10

राज्यपालांच्या हस्ते राज्यस्तरीय डाक तिकीट प्रदर्शनाचं उद्घाटन

भारतीय टपाल विभागानं आपल्या दीडशे वर्षांहून अधिक काळाच्या वाटचालीत संवेदनशील सेवा देऊन लोकांशी भावनिक नाते जोपासले असल्याचं राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ते आज भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र परिमंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय डाक तिकीट प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. मुंबईच्या जागतिक व्यापार केंद्रात पुढील चार दिवस हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. यावेळी राज्यपालांच्या हस्ते नाशिक येथील पांडव लेणी वरील स्थायी चित्रे,  मूलचंद जी शाह यांच्या जीवनावर आधारित कस्टमाइज्ड  माय  स्टॅ...

January 16, 2025 7:33 PM January 16, 2025 7:33 PM

views 14

जागतिक हवामान बदल रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

जागतिक हवामान बदल रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी आज चंद्रपूर इथं सांगितलं. हवामान बदल २०२५ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी एका अॅप ची निर्मिती करणार असल्याचं परिषदेचे संयोजक सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.