September 18, 2024 8:55 AM September 18, 2024 8:55 AM

views 9

सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करावा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

नेत्रदान ही लोक चळवळ बनवण्यासाठी सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काल मुंबईत केलं. राज्यपालांच्या संकल्पनेतून राजभवनात 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत नेत्रदान संकल्प अभियान आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांचा काल राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

September 1, 2024 3:25 PM September 1, 2024 3:25 PM

views 2

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते देशातल्या ५० युवा नादस्वरम कलाकारांना शिष्यवृत्तीचे धनादेश प्रदान

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज देशातल्या ५० युवा नादस्वरम कलाकारांना शिष्यवृत्तीचे धनादेश प्रदान करण्यात आले. मुंबईत झालेल्या 'नादस्वर उत्सव' या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते युवा आणि होतकरू नादस्वरम वादकांना प्रत्येकी १ लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते प्रसिद्ध नादस्वर वादक शेषमपट्टी शिवलिंगम यांना श्री षण्मुखानंद नादस्वरम चक्रवर्ती संगीत कला विभूषण जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. इलेक्‍ट्रॉनिक स्वरवाद्यांच्या वाढत्या प्रसारामुळे नाद...