June 18, 2025 7:07 PM June 18, 2025 7:07 PM

views 12

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट

आदिवासी विकासासाठी राखीव असलेला निधी आदिवासी विकास योजनांसाठीच वापरला जावा, आदिवासींसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ आदिवासींनाच व्हावा, बोगस आदिवासी प्रमाणपत्र धारकांवर कडक कारवाई करावी, तसंच पेसा भागांच्या विकासावर विशेष लक्ष देण्यासंदर्भात आपण आग्रही असून, न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिनस्त राहून पेसा भागात आदिवासी कर्मचाऱ्यांची पदभर्ती करण्यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असं आश्वासन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी दिलं आहे. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली ए...

March 25, 2025 7:14 PM March 25, 2025 7:14 PM

views 8

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या चौथ्या वार्षिक दीक्षांत समारंभाला राज्यपालांची उपस्थिती

विज्ञान तंत्रज्ञान युगात विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा लाभ घेत देशासाठी समर्पित भावनेनं काम केलं तर विकसित भारताचं उद्दिष्ट्य २०४७च्या किमान दहा वर्षे अगोदरच साध्य होईल, असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं.  राज्यपालांच्या उपस्थितीत डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा चौथा वार्षिक दीक्षांत समारंभ आज मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. 

February 28, 2025 3:46 PM February 28, 2025 3:46 PM

views 18

भाषा टिकली तर संस्कृती टिकेल – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

भाषा टिकली तर संस्कृती टिकेल. म्हणून  मुलांना मराठी बोलण्यासाठी,  लिहिण्यास प्रेरित करावं आणि प्रत्येकानं किमान एक मराठी वृत्तपत्र घरी आणावं, असं आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काल राजभवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

February 23, 2025 3:22 PM February 23, 2025 3:22 PM

views 12

अमरावती विद्यापीठाने रोजगारक्षम विद्यार्थी घडवावेत, राज्यपालांचं आवाहन

कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा अशा प्रगत क्षेत्रात शिक्षण देऊन अमरावती विद्यापीठाने रोजगारक्षम विद्यार्थी घडवावेत, असं आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल आणि कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज केलं. अमरावती विद्यापीठाच्या ४१व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. संस्कृत, पाली, इंग्रजी, हिंदी आणि भारतातील इतर भाषांमध्ये साठवलेले ज्ञान मराठीत भाषांतरित व्हावं, जेणेकरून सामान्य माणसाला त्याचा फायदा होईल, असं आवाहनही यावेळी राधाकृष्णन यांनी केलं. 

February 17, 2025 9:04 PM February 17, 2025 9:04 PM

views 8

९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलन गीताचं राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

नवी दिल्लीतल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त तयार केलेल्या संमेलन गीताचं प्रकाशन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज मुंबईतल्या राजभवनात झालं. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, आता मराठी भाषेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं.    हे संमेलन गीत ज्येष्ठ गायक हरिहरन, शंकर महादेवन, प्रियंका बर्वे, मंगेश बोरगावकर, शमीमा अख्तर आदींनी गायलं आहे.

February 15, 2025 6:18 PM February 15, 2025 6:18 PM

views 8

जगभरातल्या सामायिक समस्यांवर मात करण्यासाठी वैचारिक देवाणघेवाण महत्वाची-राज्यपाल

जगभरातल्या सामायिक समस्यांवर मात करण्यासाठी वैचारिक देवाणघेवाण महत्वाची असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ते काल राज भवन इथं जागतिक आर्थिक मंचाच्या युवा जागतिक नेत्यांच्या ५० सदस्यीय प्रतिनिधी मंडळाला संबोधित करत होते. या प्रतिनिधी मंडळात ४० देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. युवा नेतृत्वाकडे समान आणि शाश्वत जग उभं करण्याची अधिक क्षमता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन, टेनिसपटू रॉजर फेडरर, फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनीही युवा जागतिक ने...

February 5, 2025 7:17 PM February 5, 2025 7:17 PM

views 14

वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी अथवा इतर व्यावसायिक शिक्षणाला कलेची जोड दिली गेली पाहिजे – राज्यपाल सी पी राधाकृष्णन

कला हा इतर प्रत्येक विषयाला समृद्ध करणारा विषय असून कला विषयामुळे जाणिवा विस्तारतात. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी अथवा इतर व्यावसायिक शिक्षणाला कलेची जोड दिली गेली पाहिजे, असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं. राज्य शासनाच्या कला संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचं उद्घाटन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत काल जहांगीर कलादालन इथे संपन्न झालं ,त्यावेळी ते बोलत होते.   यावेळी ज्येष्ठ अमूर्त चित्रकार लक्ष्मण श्रेष्ठ यांना राज...

February 5, 2025 7:15 PM February 5, 2025 7:15 PM

views 4

कृषीप्रधान संस्कृती आणि सर्वाधिक लोकसंख्यांक लोकशाही जपण्याची सामूहिक जबाबदारी सर्वच क्षेत्रांची असली तरी सर्वाधिक टक्का असणाऱ्या कृषी क्षेत्रावर आणि पर्यायानं कृषी पदवीधरांवर ती जास्त आहे – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

कृषीप्रधान संस्कृती आणि सर्वाधिक लोकसंख्यांक लोकशाही जपण्याची सामूहिक जबाबदारी सर्वच क्षेत्रांची असली तरी सर्वाधिक टक्का असणाऱ्या कृषी क्षेत्रावर आणि पर्यायानं कृषी पदवीधरांवर ती जास्त आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते अकोला इथं डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३९ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. संपूर्ण विश्वाचं उदरभरण करण्याची क्षमता भारतीय कृषिक्षेत्रात आहे, असं ते म्हणाले. शाश्वत ग्रामविकासासाठी कृषी विद्यापीठांनी मध्यवर्ती भूमिका बजावावी, असं आवाहन राज्...

January 23, 2025 8:10 PM January 23, 2025 8:10 PM

views 13

भारतीय कृषि व्यवस्था जागतिकीकरणाकडे जात असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन

भारतीय कृषि व्यवस्था हळूहळू उच्च दर्जाच्या कृषि उत्पादनातून जागतिकीकरणाकडे जात असल्याचं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते आज परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाच्या २६ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. स्वातंत्र्यानंतर अन्नधान्य आयात करणाऱ्या देशाची भूक भागवून सध्या देश कृषि उत्पादन निर्यातीमध्ये जगात अग्रेसर ठरत आहे, असं ते म्हणाले.

January 21, 2025 2:56 PM January 21, 2025 2:56 PM

views 15

दृष्टिहीनांना नवी दृष्टी मिळण्यासाठी नेत्रदानाचा संकल्प करावा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

नेत्रदानातून अनेक दृष्टिहीनांना नवी दृष्टी मिळू शकते, त्यामुळे अधिकाधिक जणांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड- नॅब या संस्थेच्या ७४ व्या स्थापना दिनानिमित्त ते काल बोलत होते. या संस्थेच्या स्थापनेत क्रिकेटपटू विजय मर्चंट यांचं योगदान असल्याचं समजल्यानंतर त्यांच्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढल्याची भावना राज्यपालांनी व्यक्त केली. ही संस्था छापखाना, बोलकी पुस्तकं, प्रशिक्षणं अशा उपक्रमांद्वारे अंध, तसंच दृष्टिबाधितांना आशा आ...