November 30, 2025 7:09 PM November 30, 2025 7:09 PM

views 27

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते मार्गदर्शनपर पुस्तिकेचं प्रकाशन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यास येणाऱ्यांसाठी मार्गदर्शनपर पुस्तिकेचं प्रकाशन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज केलं. यावेळी त्यांनी भित्तीपत्रकांचंही प्रकाशन केलं. राज्यपालांनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याचा गौरव केला. बाबासाहेबांच्या मूल्यांच्या प्रसारासाठी आपण दौरा करणार असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं.

October 18, 2025 7:18 PM October 18, 2025 7:18 PM

views 25

राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या दिवाळीनिमित्त शुभेच्छा

महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिवाळीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळीचा सण म्हणजे अंधःकारावर प्रकाशाचा, अन्यायावर न्यायाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेच्या विजयाचं प्रतीक आहे असं सांगून स्वदेशी उत्पादनांचा वापर करण्याचं आवाहन त्यांनी शुभेच्छा संदेशातून केलं आहे. पर्यावरण रक्षण, नैसर्गिक संसाधनांचा आदर आणि नैसर्गिक शेती यासारख्या शाश्वत जीवन मूल्यांचा अवलंब करून उज्ज्वल, समृद्ध आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीत सहभागी होण्याचं आवाहनही राज्यपालांनी केलं.