July 11, 2025 7:24 PM July 11, 2025 7:24 PM

views 10

सरकारी जमिनीवरील अतिक्रमणास जबाबदार असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा विचार

राज्यातल्या सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करण्यासाठी जबाबदार असणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विचार सुरू आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली. राज्यातील वन विभागाच्या बाहेर असणाऱ्या बफर झोनमधल्या शेतजमिनी वार्षिक भाड्यानं घेऊन त्यावर सौर ऊर्जा प्रकल्प अथवा सुगंधी गवत लावलं जाईल, अशी माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली. जंगली प्राण्यांच्या भीतीमुळे याठिकाणी शेती होत नसल्याचा मुद्दा सुलभा खोडके यांनी उपस्थित केला...