August 5, 2025 7:17 PM August 5, 2025 7:17 PM

views 30

नागरिकांना रिक्षा, टॅक्सीची सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकार छावा राइड ॲप सुरू करणार

ओला, उबेर, रॅपिडोच्या धर्तीवर राज्य सरकार ‘छावा राइड’ या ॲपच्या माध्यमातून राज्य सरकार नागरिकांना खासगी वाहतूक सुविधा पुरवणार आहे.   या ॲपवरुन नागरिकांना रिक्षा, टॅक्सी आणि बसचे आरक्षण करता येईल. एसटी महामंडळ हे ॲप सुरू करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

March 1, 2025 11:20 AM March 1, 2025 11:20 AM

views 16

दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारच्या काळातील अहवाल उघड

दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारच्या काळात सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवा व्यवस्थापनावरील भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्या अहवालात ताशेरे ओढण्यात आले आहेत. कोविड काळात निधीचा कमी वापर, प्रकल्प अंमलबजावणीतील विलंब आणि शहरातील रुग्णालयांमध्ये औषधे आणि कर्मचाऱ्यांची कमतरता हे मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहे.   मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली विधानसभेत सादर केलेल्या अहवालात मागील सरकारनं कोविड काळात केंद्राकडून मिळालेल्या सुमारे 788 कोटींपैकी सुमारे 543 कोटी रु...

February 5, 2025 10:44 AM February 5, 2025 10:44 AM

views 26

शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल काल परिषदेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवारांनी दहा दिवसांच्या आत गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायांकीत प्रतीसाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करावा, असं आवाहन परिषदेतर्फे करण्यात आलं आहे.

October 18, 2024 10:01 AM October 18, 2024 10:01 AM

views 12

ऑनलाइन गैरव्यवहारांच्या वाढत्या धोक्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी स्कॅम से बचो अभियान सुरू

ऑनलाइन गैरव्यवहारांच्या वाढत्या धोक्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार आणि मेटा कंपनीनं स्कॅम से बचो हे अभियान सुरू केलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, गृह मंत्रालय तसंच भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र यांनी मिळून या अभियानाचा आराखडा निश्चित केला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या उपस्थितीत या अभियानाचा काल नवी दिल्लीत प्रारंभ करण्यात आला.   डिजिटल सुरक्षा आणि सतर्कता याबाबतच्या सरकारच्या दृष्टीकोनाचं प्रतिबिं...