June 27, 2025 11:07 AM June 27, 2025 11:07 AM

views 14

हॉकी इंडिया मास्टर्स करंडक स्पर्धेत, पुरुष गटात अंतिम लढत महाराष्ट्र आणि तमिळनाडू यांच्यात होणार

हॉकी इंडिया मास्टर्स करंडक स्पर्धेत, पुरुष गटात अंतिम लढत आज महाराष्ट्र आणि तमिळनाडू यांच्यात होणार आहे. आज संध्याकाळी चेन्नई इथं चार वाजता हा सामना होणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत, तमिळनाडूनं चंदीगडचा 3-0 असा पराभव केला तर दुसऱ्या उपांत्य फेरीत, महाराष्ट्राने ओडिशाविरुद्ध 4-1 असा विजय मिळवला. दरम्यान, महिलांच्या गटात आज अंतिम सामना ओडिशा आणि पंजाब यांच्यात होणार असून, चेन्नईमध्ये आज दुपारी दोन वाजता हा सामना होईल. पहिल्या उपांत्य फेरीत, ओडिशानं तमिळनाडूचा 4-1 असा पराभव केला, तर दुसऱ्या उपांत्य...

February 5, 2025 7:15 PM February 5, 2025 7:15 PM

views 1

कृषीप्रधान संस्कृती आणि सर्वाधिक लोकसंख्यांक लोकशाही जपण्याची सामूहिक जबाबदारी सर्वच क्षेत्रांची असली तरी सर्वाधिक टक्का असणाऱ्या कृषी क्षेत्रावर आणि पर्यायानं कृषी पदवीधरांवर ती जास्त आहे – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

कृषीप्रधान संस्कृती आणि सर्वाधिक लोकसंख्यांक लोकशाही जपण्याची सामूहिक जबाबदारी सर्वच क्षेत्रांची असली तरी सर्वाधिक टक्का असणाऱ्या कृषी क्षेत्रावर आणि पर्यायानं कृषी पदवीधरांवर ती जास्त आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते अकोला इथं डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३९ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. संपूर्ण विश्वाचं उदरभरण करण्याची क्षमता भारतीय कृषिक्षेत्रात आहे, असं ते म्हणाले. शाश्वत ग्रामविकासासाठी कृषी विद्यापीठांनी मध्यवर्ती भूमिका बजावावी, असं आवाहन राज्...