October 21, 2025 3:22 PM October 21, 2025 3:22 PM

views 150

ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचं निधन

प्रसिद्ध अभिनेता गोवर्धन असरानी यांचं काल मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. सहाय्यक अभिनेता आणि विनोदी अभिनेता म्हणून नाव कमावलेल्या असरानी यांनी पुण्याच्या चित्रपट प्रशिक्षण संस्थेत अभिनयाचे धडे गिरवले होते. अभिमान, गुड्डी, चुपके चुपके अशा अनेक चित्रपटांमधे त्यांनी मुख्य कलाकारांच्या बरोबरीने प्रेक्षकांवर ठसा उमटवला होता. फकीरा आणि चला मुरारी हीरो बनने या चित्रपटांमधे त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यांची शोले चित्रपटातील जेलरची भूमिका चिरस्मरणीय ठरली. मुंबईत काल त्यांच्...