November 4, 2025 8:04 PM November 4, 2025 8:04 PM
18
हिंदुजा उद्योगसमूहाचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांचं निधन
प्रसिद्ध उद्योगपती आणि हिंदुजा उद्योगसमूहाचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांचं आज लंडनमधे निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. ब्रिटनमधल्या सर्वात श्रीमंत व्यक्तिंमधे त्यांचा समावेश होता. मुंबईत हिंदुजा उद्योगसमूहातून त्यांनी कारकिर्दीला प्रारंभ केला होता. गेली दोन वर्षं हिंदुजा समूहाचं अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं.