May 12, 2025 3:34 PM May 12, 2025 3:34 PM

views 2

गोपाळ कृष्ण गोखले पुलाचं पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईत अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या, नव्यानं बांधण्यात आलेल्या  गोपाळ कृष्ण गोखले पुलाचं काल मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन झालं.    अभियांत्रिकी आव्हानांना न जुमानता विक्रमी वेळेत पूर्ण झालेला हा पूल वाहतूक कोंडी कमी करेल. हा पूल  नियोजित तारखेच्या एक महिना आधीच वाहतुकीसाठी खुला झाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. हा पूल ३१ मे पर्यंत वाहतुकीसाठी खुला होणं नियोजित होतं.