October 14, 2025 8:10 PM

views 68

विशाखापट्टणम इथं AI हब स्थापन करण्यासाठी १५ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूकीची गुगलची घोषणा

आंध्रप्रदेशात विशाखापट्टणम इथं एआय हब स्थापन करण्यासाठी पुढची पाच वर्षं १५ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा गुगलनं आज केली. नवी दिल्लीत सुरू असलेल्या भारत एआय शक्ती या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. एक गिगावॅट स्केल डेटा सेंटर पायाभूत सुविधा असलेल्या या हबमुळे विशाखापट्टणम जागतिक नवोन्मेषाचं केंद्र म्हणून उदयाला येईल. देशाचं डिजिटल भविष्य आणि शाश्वत विकासासाठी गुगल वचनबद्ध आहे हे या गुंतवणुकीतून दिसतं असं गुगल क्लाउडचे सीईओ थॉमस कुरियन म्हणाले.   एआय हबमुळे डिजिटल अर्थव्...