November 29, 2025 5:02 PM
19
दरेकसा दलमच्या 11 जहाल नक्षलवाद्यांची गोंदिया पोलिसांकडे शरणागती
नक्षल संघटनेतला वरिष्ठ नेता अनंत उर्फ विनोद साय्यणा याच्यासह ११ नक्षली अतिरेक्यांनी काल गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. यामुळं नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. हे सर्वजण दरेकसा दलम या नक्षल गटाचे सदस्य होते असं गडचिरोली रेंज चे पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल यांनी सांगितलं. यावेळी पोलिसांनी नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला आहे. या सर्व नक्षलवाद्यांवर सरकारनं 89 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. गेल्याच आठवड्यात शरणागतीसाठी मुदत मागणारं पत्र अनंत ने महाराष्ट्रा...