June 12, 2025 3:04 PM June 12, 2025 3:04 PM

views 9

गोंदिया जिल्ह्यात गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

गोंदिया जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्याविरुद्ध मोहीम सुरू असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं वसंतनगर इथं गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून जवळपास एक लाख ४४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांसह खरेदी करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

May 30, 2025 7:40 PM May 30, 2025 7:40 PM

views 13

गोंदियामध्ये ऍल्युमिनियम तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

गोंदियामध्ये इलेक्ट्रिक खांबावरच्या ऍल्युमिनियम तारांची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. गोंदिया जिल्ह्याच्या रावणवाडीमधल्या मुरपार इथून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून ऍल्युमिनियम कंडक्टर ताराचे तीन मोठे बंडल, इलेक्ट्रिक खांबाला लावण्यात येणारे अर्थिंग वायर, कब्जे, चॅनेल एक्सटेन्शन वायर, असा एकूण किंमत ४ लाख ७५ रुपयांचा माल जप्त केला आहे.

May 19, 2025 7:08 PM May 19, 2025 7:08 PM

views 24

महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचं धरणे आंदोलन

महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेनं आज गोंदियात प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन केलं.  शासकीय कामाकरता लॅपटॉप द्यावा, कृषी सेवकांना कृषी सहायक पदावर नियुक्त करावं, कृषी सहायकाचं पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावं, कृषी सहायकांना मदतनीस देण्यात यावा आदी मागण्या आंदोलकानी केल्या. त्याचप्रमाणे कृषी विभागाच्या आकृतीबंधाला तात्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणीही आंदोलकानी केली आहे. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तीव्र आंदोलनाचा  इशारा कृषी आंदोलकांनी  दिला आहे.

February 10, 2025 7:37 PM February 10, 2025 7:37 PM

views 40

गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपचे ४ सभापती

गोंदिया जिल्हा परिषदेत आज सभापतीपदांसाठी निवडणूक पार पडली. यात भाजपाचे चार सभापती निवडून आले. गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती असल्यामुळे एक सभापती पद राष्ट्रवादीला दिलं जाईल असं सांगितलं जात होतं, मात्र चारही जागांवर भाजपाच्या सदस्यांची निवड झाली आहे. ५३ सदस्यांच्या गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपाचे ३० सदस्य असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ सदस्य आहेत. 

December 28, 2024 3:23 PM December 28, 2024 3:23 PM

views 14

सात लाखाचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्याचं आत्मसमर्पण

सात लाखाचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्यानं गोंदिया पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केलं आहे. देवा सुमडो मुडाम असं या माओवाद्याचं नाव असून तो छत्तीसगड राज्यातील बिजापूर इथला आहे. आत्मसमर्पित माओवादी देवा अति नक्षल प्रभावित भागात असल्यानं बालपणापासूनच तो नक्षल चळवळीत सहभागी झाला होता.

October 13, 2024 3:45 PM October 13, 2024 3:45 PM

views 17

गोंदियातल्या तिरोडा-गोरेगाव मतदार संघातली ७५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार – उपमुख्यमंत्री फडणवीस

गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा-गोरेगाव मतदार संघातली ७५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्यानं हा मतदारसंघ सुजलाम्-सुफलाम् होणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रातल्या धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक दोन अंतर्गत ५ हजार २१७ कोटी रुपयांच्या विकासकामांचं तसंच, तिरोडा नगर परिषद आणि गोरेगाव नगर पंचायत क्षेत्रातल्या २०५ कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आज फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार...

September 15, 2024 6:45 PM September 15, 2024 6:45 PM

views 18

गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पूर परिस्थितीची केली पाहणी

गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आज जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची पाहणी केली. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातल्या अनेक गावात पाणी शिरलं आहे आणि शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. पालकमंत्र्यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली आणि तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

September 12, 2024 10:43 AM September 12, 2024 10:43 AM

views 10

भंडारा-गोंदियाला अतिवृष्टीचा फटका

महाराष्ट्राच्या, भंडारा गोंदिया जिल्ह्यात काल ढग फुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहू लागले आणि अनेक गावांचा संपर्क तुटला. वैनगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे 27 दरवाजे दीड मीटरने तर 6 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आली आहेत. दरम्यान वैनगंगा नदीवर पुलाच्या बांधकामात वापरण्यात येणारी क्रेन पुराच्या प्रवाहात वाहून गेली असून या क्रेनला आठ किलोमिटर अंतरावर पाण्याबाहेर काढण्यात यश आलं आहे.  

September 8, 2024 7:15 PM September 8, 2024 7:15 PM

views 16

विनोद अग्रवाल यांच्या घरावर गोंड गोवारी समाजाचा धडक मोर्चा

गोंड, गोवारी जमातींना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनुसूचित जमातीचे सर्व लाभ पूर्ववत सुरू करण्याबाबत शासनानं सात दिवसात निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन सुरु करु, असा इशारा या समाजानं दिला आहे. या मागणीसाठी गोंदिया जिल्ह्यात आज विनोद अग्रवाल यांच्या घरावर गोंड गोवारी समाजानं त्यांच्या धडक मोर्चा काढला.    १९८५ च्या शासन निर्णयातली गोंड, गोवारी जमातीविषयी चुकीची माहिती तात्काळ दुरुस्ती करुन हे लाभ पूर्ववत सुरू करावेत, सेवानिवृत्त न्यायाधीश के एल वडने सर समितीला दिलेली मुदतवाढ रद्द क...

July 17, 2024 7:49 PM July 17, 2024 7:49 PM

views 12

गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत पावसामुळे शेतकरी सुखावला

गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांत पावसाच्या दमदार हजेरीनं शेतकरी सुखावला असून पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या आहेत.   गोंदिया जिल्ह्यात आज पावसानं दमदार हजेरी लावल्यानं भातपिकाला याचा मोठा फायदा झाला आहे. पाण्याच्या पंपाची सोय उपलब्ध नसलेल्या वरथेंब शेतकऱ्यांची पावसाची प्रतीक्षा संपली असून, भात रोवणीला सुरुवात झाल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे.   भंडारा जिल्ह्यातही बऱ्याच प्रतीक्षेनंतर पावसाने मेघगर्जनेसह जोरदार हजेरी लावली आहे. तर पवनी तालुक्यात ...