July 24, 2024 1:28 PM July 24, 2024 1:28 PM

views 23

आयात शुल्क कमी केल्यानंतर सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये घसरण सुरूच

सोनं आणि चांदीवरचं आयात शुल्क अर्थसंकल्पात कमी केल्यानंतर या धातूंच्या दरांमध्ये होणारी घसरण आजही सुरूच आहे. २४ कॅरेट सोनं कालपासून तोळ्यामागे सुमारे ३ हजार ४०० रुपये आणि २२ कॅरेट सोनं तोळ्यामागे ३ हजार ३०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. सध्या २४ कॅरेट सोन्याचे दर ६९ हजार रुपयांच्या पलीकडे आणि २२ कॅरेट सोन्याचे दर ६७ हजार ५०० रुपयांच्या पलीकडे आहेत. चांदी कालपासून सुमारे २ हजार ६०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. सध्या चांदीचा दर किलोमागे सुमारे ८५ हजार रुपये आहे.

July 17, 2024 3:10 PM July 17, 2024 3:10 PM

views 14

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर १३ किलोपेक्षा जास्त सोनं जप्त

सीमाशुल्क विभागाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सुमारे सव्वातेरा किलो वजनाचं सोनं, एक कोटी ३८ लाख रुपये किमतीची इलेक्ट्रॉनिक उपकरणं, आणि सुमारे ४५ लाख रुपये मूल्याचं परकीय चलन जप्त केलं आहे.   १० ते १४ जुलैदरम्यान २४ वेगवेगळ्या प्रकरणांमधे ही जप्ती झाली असून सात जणांना अटक झाली आहे. त्यांची कसून चौकशी होत असल्याचं सीमाशुल्क विभागाच्या सूत्रांनी सांगितलं. हे सोनं कपडे, कागद आणि शरीरावर विविध स्वरूपात लपवून आणलं होतं.