June 19, 2024 2:26 PM June 19, 2024 2:26 PM
17
विश्व एथलेटिक्स कॉन्टिनेंटल गोल्ड टूर स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राला सुवर्ण पदक
भारताचा ऑलिम्पिक आणि विश्वविजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याने फीनलंड इथ सुरू असलेल्या विश्व एथलेटिक्स कॉन्टिनेंटल गोल्ड टूर स्पर्धेत काल सुवर्ण पदक पटकावलं. काल रात्री उशिरा झालेल्या सामन्यात नीरजनं तिसऱ्या प्रयत्नात ८५ पूर्णांक ९७ शतांश मीटर अंतरा वर भालाफेक करून हे यश मिळवलं. तत्पूर्वी त्याने पहिल्या प्रयत्नांत ८३ पूर्णांक ६२ शतांश मीटर अंतरावर भाला फेक करून आपल्या खेळाची सुरुवात केली होती.