November 12, 2025 1:23 PM November 12, 2025 1:23 PM

views 41

सोनं तस्करी प्रकरणी ११ जणांना अटक

सोन्याची तस्करी केल्या प्रकरणी डीआरआय, अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं काल मुंबईत ११ जणांना अटक केली. या कारवाईत  ११ किलो ८८ ग्रॅम  सोनं आणि ८ किलो ७७ ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली. तस्करी केलेलं सोनं मुंबईत काळबादेवी आणि माझगाव परिसरात वितळवून स्थानिक बाजारात त्याची विक्री केली जात होती, अशी माहिती  गुप्तचर यंत्रणेनं दिली.  या प्रकरणी पुढला तपास सुरु असल्याचं डीआरआय च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.