April 6, 2025 7:04 PM April 6, 2025 7:04 PM
10
मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशाकडून १२०० ग्रॅम सोनं जप्त
मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी एका प्रवाशाकडून १ कोटी २ लाख रूपये किंमतीचं १२०० ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं आहे. जेदाह इथून इंडिगो एअरलाइन्सच्या विमानातून आलेल्या या प्रवाशाच्या बँगेची तपासणी केली असता त्यातून आणलेल्या दोन इलेक्ट्रिक इस्त्र्यांमध्ये २४ कॅरट सोन्याचे १६ तुकडे लपवल्याचं आढळून आलं. सदर प्रवाशाला सीमाशुल्क कायदा १९६२ अंतर्गत ताब्यात घेण्यात आलं आहे.