May 25, 2025 7:17 PM May 25, 2025 7:17 PM

views 9

डॉलरच्या घसरणीमुळे जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात सर्वोच्च वाढ

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्कवाढीच्या घोषणेनंतर आणि डॉलरमध्ये झालेल्या घसरणीमुळे जागतिक पातळीवर सोन्याच्या किमतीत सर्वोच्च वाढ नोंदवली गेली. या आठवड्यात सोन्याचे दर पाच टक्क्यांनी वाढून ३ हजार ३५७ डॉलर्स प्रतिऔंस इतके झाले आहेत. या आठवड्यात चांदीच्या किमतीतही ३३ डॉलर्स प्रति औंस इतकी वाढ झाली आहे.

April 22, 2025 2:57 PM April 22, 2025 2:57 PM

views 11

देशात सोन्याच्या दराने गाठला तोळ्यामागे १ लाख रुपयांचा टप्पा

देशात सोन्याच्या किमतींनी आज तोळ्यामागे १ लाख रुपयांची पातळी ओलांडली. इंडियन बुलियन अँड ज्वेलरी असोसिएशनने दिलेल्या दरांनुसार सकाळी व्यवहार सुरू झाला तेव्हा २४ कॅरेट सोनं प्रति तोळा १ लाख २ हजार रुपयांपेक्षा महाग मिळत होतं.   २२ कॅरेट सोन्याचे दर १ लाख १ हजार ६०० रुपयांपेक्षा अधिक झाले होते. कालच्या तुलनेत सोनं सुमारे अडीच हजार रुपयांनी महागलं. चांदी सुमारे ९८ हजार ८०० रुपये किलोनं मिळत होती. कमोडिटी बाजारातही सोन्याचे व्यवहार १ लाख रुपयांच्यावर होत आहेत.     जगभरातल्या केंद्रीय बँकांन...

April 16, 2025 8:46 PM April 16, 2025 8:46 PM

views 9

२४ कॅरेट सोन्याचे दर पहिल्यांदाच ९७ हजारांच्या पलीकडे, चांदी १ लाखाच्या उंबरठ्यावर

दररोज उच्चांकी पातळी गाठण्याची चढाओढ सोन्या-चांदीच्या दरात आजही कायम राहिली. त्यामुळं सोनं आणि चांदी आज सुमारे दीड हजार रुपयांनी महाग झालं. मुंबईच्या बाजारपेठेत २४ कॅरेट सोनं ९७ हजार ४१७ रुपये तोळा, २२ कॅरेट सोनं ९५ हजार रुपये तोळा, तर चांदी सुमारे ९९ हजार ५०० रुपये किलो दराने मिळत होती.    भारतीय वायदे बाजारात सोन्यानं पहिल्यांदाच ९५ हजार रुपयांची पातळी ओलांडली. अमेरिकी वायदे बाजारात पहिल्यांदाच सोन्याचे दर ३ हजार ३०० डॉलर प्रति औंस या दराच्या पलीकडे गेले आहेत.

April 11, 2025 8:41 PM April 11, 2025 8:41 PM

views 13

सोनं, चांदी महागली !

देशात आज सोनं तोळ्यामागे सुमारे ३ हजार रुपयांनी महागलं. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचे दर तोळ्यामागे ९५ हजारांच्या ८६२ रुपयांच्या पलीकडे पोहोचलं. २२ कॅरेट सोन्याचे दर ९३ हजार ५०० रुपयांपेक्षा जास्त होते. चांदीही किलोमागे सुमारे २ हजार रुपयांनी महाग होऊन ९५ हजार ४०० झाली.

February 4, 2025 7:57 PM February 4, 2025 7:57 PM

views 19

मुंबईत २४ कॅरेट सोन्याचे दर ८५ हजारांच्या उच्चांकी पातळीच्या पलीकडे

मुंबईत २४ कॅरेट सोन्याच्या किमती आज तोळ्यामागे पहिल्यांदाच ८५ हजाराच्या पलीकडे गेल्या. मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याची किंमती प्रतितोळा ८५ हजार ५९३ रुपये होती. २२ कॅरेट सोनं ८३ हजार १०० रुपये तोळा दरानं मिळत होतं. मुंबईत चांदीचा दर मात्र गेल्या पाच दिवसांच्या तेजीनंतर आज काहीसा घसरून ९६ हजार ११२ रुपये प्रतिकिलो इतका झाला आहे.

October 29, 2024 1:04 PM October 29, 2024 1:04 PM

views 11

धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या दरात घट

देशांतर्गत सराफा बाजारात आज धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या किमतीत प्रतितोळा ५०० रुपयांची घट झाली आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत आज ८० हजारांवरून घसरून ७९ हजार ७९० रुपये झाली आहे तर २२ कॅरेट सोन्याचा दर ७३ हजार १४० रुपये झाला आहे. चांदीच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नसून चांदीचा दर ९७ हजार ९०० रुपये प्रतिकिलो इतका आहे.

October 23, 2024 7:39 PM October 23, 2024 7:39 PM

views 9

राज्यात सोनं-चांदीच्या दरात वाढ

राज्यात तोळ्यामागे सोन्याचे दर तोळ्यामागे ८० हजारांच्या पुढे गेले असून चांदी किलोमागे १ लाख रुपये झाली आहे. कालच्या तुलनेत सोनं-चांदी आज सुमारे ४००-५०० रुपयांनी महागलं. २४ कॅरेट सोनं जीएसटी शिवाय ७८ हजार ७०० रुपये तोळा आणि २२ कॅरेट सोन्याचे व्यवहार ७८ हजार ४०० रुपये दराने होत होते. चांदीचे व्यवहार ९८ हजार ८६२ रुपये किलो दरानं होत होते.    दिवाळी आणि लग्नसराईमुळं ही दरवाढ होते आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातले चढ-उतार, महागाईचे दबाव आणि जागतिक राजकीय तणाव यांसारख्या आर्थिक घटकांचाही सोन्य...