August 27, 2025 8:22 PM August 27, 2025 8:22 PM

views 10

आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या महिला संघानं पटकावलं सुवर्णपदक

कझाकस्तान इथं सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत, महिलांमधे ५० मीटर थ्री पोझिशन सांघिक प्रकारात सिफ्त कौर सर्मा, आशी चौक्सी, आणि अंजुम मौदगिल यांनी सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्टलमधे भारतीय नेमबाज अनीश भनवाला याचं सुवर्णपदक अवघ्या एका गुणानं हुकलं, आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. चीनच्या सू लियाबोफान यानं ३६ गुणांसह सुवर्णपदक पटकावलं, तर दक्षिण कोरियाच्या स्पर्धकानं कांस्यपदक मिळवलं.   याच प्रकारात सांघिक स्पर्धेतही भारतानं रौप्य पदक पटकावलं. दक्षिण...

August 7, 2025 1:40 PM August 7, 2025 1:40 PM

views 17

आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या अनू राणीला सुवर्ण पदक

पोलंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या अनू राणीनं सुवर्ण पदक पटकावलं. तिनं यंदाच्या हंगामातल्या सर्वोत्तम अशा ६२ पूर्णांक ५९ शतांश मीटर अंतरावर भाला फेकला. या विजयामुळे अनू राणीला जगातल्या सर्वोत्तम महिला खेळाडुंमध्ये स्थान मिळालं आहे. इतर स्पर्धांमध्ये भारताच्या पूजा हिनं ८०० मीटर महिलांच्या शर्यतीत तिसरं स्थान मिळवलं.

April 9, 2025 1:35 PM April 9, 2025 1:35 PM

views 11

आयएसएसएफ विश्वकरंडक स्पर्धेत विजयवीर सिधू तसेच सुरूची सिंगनं पटकावलं सुवर्णपदक

अर्जेंटिनामध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वकरंडक स्पर्धेत, काल विजयवीर सिधू याने पुरूषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. तर महिला श्रेणीत सुरूची सिंगनं १० मीटर एअर रायफल प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलं.