October 22, 2025 8:20 PM October 22, 2025 8:20 PM

views 61

खुशखबर! सोनं, चांदीच्या दरात घसरण

पाडव्याच्या मुहुर्तावर सर्वसामान्यांना दिलासा देत सोनं आणि चांदीच्या दरात आज मुंबईच्या बाजारपेठेत घसरण झाली. सोनं तोळ्या मागे पावणे ४ हजार रुपयांनी तर चांदी किलोमागे १० हजार रुपयांनी आज स्वस्त झाली. तरी ९२ कॅरेट सोन्यासाठी तोळ्यामागे सव्वा लाख रुपये आणि एक किलो चांदीसाठी १ लाख ५७ हजार रुपये मोजावे लागत होते.

April 7, 2025 8:41 PM April 7, 2025 8:41 PM

views 15

अमेरिकेनं जाहीर केलेल्या करकपातीमुळं सोनं, चांदीच्या दरातही मोठी घसरण

अमेरिकेनं जाहीर केलेल्या करकपातीमुळं सोनं, चांदीच्या दरातही आज मोठी घसरण झाली. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएनशननं दिलेल्या दरांनुसार सोनं सुमारे २ हजार रुपये तोळा आणि चांदी अडीच हजार रुपये किलोनं स्वस्त झाली. त्यामुळं २२ कॅरेट सोनं तोळ्यामागे ८९ हजार ५०० रुपये आणि चांदी किलोमागे ९३ हजार १०० रुपये दरानं मिळत होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं प्रति औंस ३ हजार २०१ डॉलरच्या उच्चांकी पातळीवरुन ३ हजार ६० डॉलर प्रति औंस पर्यंत घसरलं होतं.    कच्च तेल २ पूर्णांक २१ शतांश टक्क्यांनी घसरुन ६४ डॉलर २४ ...

March 15, 2025 3:37 PM March 15, 2025 3:37 PM

views 8

मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक

मुंबईत सीमाशुल्क विभागाने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सोन्याची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून तस्करीचं साडेतीन कोटीपेक्षा जास्त किंमतीचं सोनं जप्त केलं आहे.   सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री संशयावरून एकाला ताब्यात घेतलं आणि त्याची झडती घेतली असता सोन्याची भुकटी असलेली पाकिटं त्याच्याकडे सापडली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी इतर दोघांनाही अटक केली आणि त्यांच्याकडून सोनं जप्त केलं.

March 15, 2025 2:56 PM March 15, 2025 2:56 PM

views 26

मुंबईत सोन्याची तस्करी करणाऱ्या ४ आरोपींना अटक

मुंबईत सीमाशुल्क विभागाने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सोन्याची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक  केली असून त्यांच्याकडून तस्करीचं साडेतीन कोटीपेक्षा जास्त किंमतीचंसोनं जप्त केलं आहे.   सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री संशयावरून एकाला ताब्यात घेतलं आणि त्याची झडती घेतली असता सोन्याची भुकटी असलेली पाकिटं त्याच्याकडे सापडली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी इतर दोघांनाही अटक केली आणि त्यांच्याकडून सोनं जप्त केलं.

February 11, 2025 7:58 PM February 11, 2025 7:58 PM

views 14

सोन्याचे दर घसरले, चांदी लाखाच्या उंबरठ्यावर

सोन्याचे दर मात्र काहीसे घसरले. आज २४ कॅरेट सोन्याचा दर तोळ्यामागे ८७ हजार ७७० रुपये इतका होता. २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर तोळ्यामागे ८५ हजार ५० रुपये इतका होता.  चांदीचे दर आज आणखी दोन हजार रुपयांची भर पडली. चांदीचा आजचा दर किलोमागे ९९ हजार ४०० रुपये इतका होता.

February 10, 2025 8:39 PM February 10, 2025 8:39 PM

views 46

सोने, चांदीच्या दरात वाढ

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या करधोरणामुळे  गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराऐवजी सोन्यात गुंतवणूक वाढवली आहे. त्यामुळं आज सोनं तोळ्यामागे सुमारे हजार रुपयांनी महाग झालं. आज २४ कॅरेट सोन्याचे दर तोळ्यामागे ८८ हजार २३५ रुपये इतके झाले. २२ कॅरेट सोन्याचे दर तोळ्यामागे ८७ हजार ८९२ रुपये इतका झाले आहेत.  चांदी २ हजार रुपयांनी महाग होऊन किलोमागे ९७ हजार ५०० रुपयांवर पोहोचली.

February 4, 2025 10:49 AM February 4, 2025 10:49 AM

views 14

महिलांच्या 50 मीटर रायफल 3 प्रकारात पंजाबच्या सीफ्ट कौर सामराला सुवर्णपदक

उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत काल झालेल्या महिलांच्या 50 मीटर रायफल 3 प्रकारात पंजाबच्या सीफ्ट कौर सामरानं सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या 10 मीटर पिस्तूल स्पर्धेत कर्नाटकच्या जोनाथन अँथनीने सुवर्णपदक जिंकलं. भारत्तोलन स्पर्धेत पंजाबच्या मेहक शर्मानं महिलांच्या 87 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावत तीन नवे राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले. पुरुषांच्या गटात, सेनादलाच्या लवप्रीत सिंगनं एकूण 367 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले, तर उत्तराखंडच्या विवेक पांडेने कास्यपदक पट...

January 31, 2025 8:27 PM January 31, 2025 8:27 PM

views 14

सोने आणि चांदीचे दर विक्रमी पातळीवर

देशात सोने आणि चांदीचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. मुंबईच्या बाजारपेठेत २४ कॅरेट सोनं कॅरेटमागे ८२ हजार रुपयांच्या पलीकडे गेलं. २२ कॅरेट सोनं ८० हजार १२० रुपये तोळा या दराने मिळत होतं. कालच्या तुलनेत सोनं आज सुमारे ८०० रुपयांनी महागलं. एक किलो चांदी ९३ हजार ५०० रुपये दराने मिळत होती.

January 15, 2025 2:16 PM January 15, 2025 2:16 PM

views 16

दक्षिण आफ्रिका: सोन्याच्या खाणीत अडकलेल्या ८२ कामगारांची सुटका, ३६ मृत

दक्षिण आफ्रिकेतल्या नॉर्थ-वेस्ट परगण्यात एका सोन्याच्या खाणीत अडकलेल्या ८२ कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं असून ३६ मृतदेह हाती लागले आहेत. अजूनही शेकडो कामगार आत अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून मदतकार्य सुरु आहे. बेकायदेशीर उत्खननावर कारवाई म्हणून पोलिसांनी गेल्या ऑगस्ट पासून बेकायदेशीर खाणींना वेढा घालून कामगारांची रसद तोडली होती. गेल्या नोव्हेंबरपासून खोलवर अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य हाती घेण्यात आलं होतं.

October 29, 2024 10:37 AM October 29, 2024 10:37 AM

views 31

सोनं-चांदी खरेदी करताना हॉलमार्कची खात्री करावी, भारतीय मानक ब्युरोचं आवाहन

धनत्रयोदशीनिमित्त सोनं-चांदी खरेदी करताना ग्राहकांनी हॉलमार्कची खात्री करावी असं आवाहन भारतीय मानक ब्युरोनं केली आहे. धनत्रयोदशीला या मौल्यवान धातूंची खरेदी करण्याची प्रथा आहे, त्या पार्श्र्वभूमीवर ग्राहकांना हॉलमार्क असलेल्या दागिन्यांचं महत्त्व पटवून देण्याचा उद्देश असल्याचं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं म्हटलं आहे.