May 10, 2025 8:19 PM May 10, 2025 8:19 PM

views 17

मुंबईतील गोखले पूलाचे उदघाटन पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार

मुंबईत अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पाचं लोकार्पण राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तसंच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्या संध्याकाळी होणार आहे.   पश्चिम उपनगरातली वाहतूककोंडी फोडणारा हा पूल वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेनं खुला झाल्यानं या भागातल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.