December 7, 2025 7:34 PM December 7, 2025 7:34 PM

views 29

गोव्यात नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू

गोव्यात आरपोरा इथल्या एका नाईट क्लबमध्ये काल रात्री लागलेल्या आगीमुळे मरण पावलेल्यांची संख्या २५ वर पोहोचली आहे. मृतांमध्ये चार पर्यटकांसह बहुतांश क्लबच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही आग गॅस सिलिंडर स्फोटामुळे लागल्याचा अंदाज स्थानिक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या क्लबमध्ये अग्निसुरक्षा नियमांचं पालन केलं गेलं नसल्याचंही वृत्त आहे. आग लागलेल्या ठिकाणावरून सर्व मृतदेह बाहेर काढले असून, पोलीस पुढचा तपास करत आहे, त्यानंतरच पुढची कारवाई केली जाईल असं गोव्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी सांग...

November 28, 2025 8:16 AM November 28, 2025 8:16 AM

views 41

56th International Film Festival of India to conclude this evening in Goa

The 56th International Film Festival of India (IFFI) 2025 will conclude today in Goa with a grand closing ceremony, paying tribute to the legendary actor Dharmendra. The festival, which began on November 20, showcased over 240 films from 81 countries, highlighting the best of global cinema.     IFFI 2025 is heading towards its closing ceremony today, which will be attended by Chief Minister Pramod Sawant, Secretary, Ministry of I&B, Sanjay Jaju and festival chairman, Shekhar Kapur, among a h...

November 8, 2025 9:46 AM November 8, 2025 9:46 AM

views 29

इफ्फी 20 नोव्हेंबरपासून गोव्यात रंगणार

गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- ईफ्फी हा भारतीय निर्मात्यांना जागतिक स्तरावर पोहोचवणारा एक महत्त्वाचा दुवा ठरेल, असा विश्वास माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांनी व्यक्त केला आहे. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.   20 नोव्हेंबरपासून इफ्फी चित्रपट महोत्सवाला सुरुवात होणार असून यात 81 देशांतील 240 चित्रपट दाखवले जाणार असल्याची माहिती मुरुगन यांनी दिली. हा महोत्सव 28 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.   महिलांनी दिग्दर्शित केलेले 50हून अधिक चित्रपट हे या वर...

May 20, 2025 1:08 PM May 20, 2025 1:08 PM

views 13

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून गोवा दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर जात आहेत. या भेटी दरम्यान, उद्या ते मोरमुगाव बंदरावर उभारण्यात आलेल्या प्रकल्पांचं लोकार्पण करतील. तसंच बंदरावरील वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधतील. गुरुवारी, उपराष्ट्रपती कृषी संशोधन केंद्राला भेट देतील. तसंच राजभवन इथं उभारण्यात आलेल्या आयुर्वेदतज्ज्ञ चरक आणि सुश्रुत यांच्या पुतळ्यांचं अनावरण करणार आहेत.

November 6, 2024 8:13 PM November 6, 2024 8:13 PM

views 17

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या गोव्याला भेट देणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या गोव्याला भेट देणार आहेत. नौदलाच्या दर्यावर एक दिवस या कार्यक्रमात त्या सहभागी होणार आहेत. नौदलाच्या लढाऊ क्षमतेचं दर्शन घडवणाऱ्या कसरती आणि आएनएस विक्रांतवरुन झेपावणाऱ्या नौदल विमानांची प्रात्यक्षिकं यावेळी सादर होतील.

October 23, 2024 8:40 PM October 23, 2024 8:40 PM

views 13

इफ्फी महोत्सवासाठी नावनोंदणी सुरू

येत्या २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत गोवा इथं होणाऱ्या ५५व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ऑस्ट्रेलिया ‘कंट्री ऑफ फोकस’ राहणार आहे. ऑस्ट्रेलियाची वैविध्यपूर्ण सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि ओळख दाखवणारे ७ चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित केले जाणार आहेत. फिल्म बजार, संयुक्तरित्या चित्रपट निर्मितीच्या संधी, ऑस्कर पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर जॉन सीएल महोत्सवात उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

July 20, 2024 11:24 AM July 20, 2024 11:24 AM

views 14

गुजरात, कोकण, गोवा आणि कर्नाटक किनारपट्टीवर अतीवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा

भारतीय हवामान खात्याने आज गुजरात, कोकण, गोवा, कर्नाटक किनारपट्टी आणि कर्नाटकच्या दक्षिणेकडील अंतर्गत भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. केरळ, तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेश, ओडिशा, विदर्भ, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.     तसंच मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दक्षिणेकडील अंतर्गत भागात आगामी 4 दिवसांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. दरम्यान, आज झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये गंगेच्या प्रदेशात आणि हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ...