October 7, 2025 2:27 PM
39
तंत्रज्ञानाचा वापर हत्यार म्हणून होता कामा नये, तर जनतेच्या कल्याणासाठी झाला पाहिजे-सीतारामन
तंत्रज्ञानाचा वापर हत्यार म्हणून होता कामा नये, तर जनतेच्या कल्याणासाठी झाला पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. सहाव्या ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन केल्यानंतर त्या मुंबईत बोलत होत्या. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कार्यक्षमतेत वाढ होते आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो असं सांगतानाच त्यांनी थेट लाभ हस्तांतरण पद्धतीचं उदाहरण दिलं. लाभार्थ्यांना हवं तिथे पैसा वापरण्याची संधी मिळाल्यामुळे बचत ठेवींमधे ४ लाख ३१ हजार कोटी रुपयांची भर पडली आहे असं त्या म्हणाल्या. ...