September 16, 2025 3:54 PM September 16, 2025 3:54 PM

views 10

जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईत जिओ वर्ल्ड कन्वेक्शन सेंटर इथं आयोजित जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. राज्य शासन कौशल्य विद्यापीठाअंतर्गत 'जेम्स अँड ज्वेलरी' क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करेल, ज्यामुळे निश्चितच या क्षेत्राच्या प्रगतीत सातत्य कायम राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.