December 1, 2025 11:02 AM

views 47

सर्वत्र गीता जयंतीचा उत्साह

गीता जयंती आज साजरी केली जात आहे. 5 हजार वर्षांपूर्वी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला भगवद्गीतेचे कालातीत उपदेश दिले त्या क्षणाचं स्मरण या दिवशी केले जातं. गीता जयंती हा केवळ धार्मिक दिवस नसून तो भगवान श्रीकृष्णानं दिलेल्या वैश्विक ज्ञानाची आठवण करून देतो. लाखो लोकांना त्यांच्या आध्यात्मिक आणि दैनंदिन जीवनात हा उपदेश मार्गदर्शन करत राहतो. भगवद्गीता काळाच्या पलीकडे जाणारी शिकवण तसंच जीवन, कर्तव्य आणि अस्तित्वाच्या स्वरूपाबद्दलच्या सर्वात मूलभूत प्रश्नांची उत्तरं देते. गी...