August 10, 2025 6:12 PM August 10, 2025 6:12 PM

views 4

घाटकोपरमधल्या पंतनगर बस स्थानकावर स्टील स्पॅन बसवण्याचं काम पूर्ण

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे MMRDA ने घाटकोपर पूर्व भागातल्या पंतनगर बस स्थानकावर स्टील स्पॅन बसवण्याचं महत्वाचं काम पूर्ण केलं. या स्पॅनची लांबी ५८ मीटर आणि वजन साडेचारशे टन होतं आणि शंभरहून अधिक कामगार, आवश्यक सुरक्षा कर्मचारी, अभियंते यांनी पाच स्टील गर्डर्सवर तो बसवण्याचं काम यशस्वीपणे पार पाडलं. हा स्पॅन बसवल्यानंतर वडाळा ते कासारवडवलीपर्यंत जाणाऱ्या  मेट्रो मार्ग चारचे काम साडेचौऱ्याऐशी टक्के पूर्ण झालं आहे.

November 9, 2024 5:14 PM November 9, 2024 5:14 PM

views 14

घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर पथनाट्य सादर करुन नागरिकांना मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढवण्याबाबत आवाहन

विधानसभा निवडणूकीच्या निमित्तानं स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी 'उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा' हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. मुंबईत घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर आज पथनाट्य सादर करुन नागरिकांना त्यांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढवण्याबाबत आवाहन करण्यात आलं.   स्वीप उपक्रमांतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज मतदानाबाबत सामुहिक प्रतिज्ञा केली. महापालिकेच्या मुख्यालयातल्या ज्ञानकेंद्रात झालेल्या या शपथ ग्रहण सोहळ्याला महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदेही उपस्थित होते.

June 13, 2024 7:45 PM June 13, 2024 7:45 PM

views 34

‘घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना अधिकची मदत मिळण्यासाठी शासन प्रयत्नशील’

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना अधिकची मदत मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याचं  मदत आणि  पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आज सांगितलं. या दुर्घटनेतील १७ मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपये आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून ४ लाख रुपये असे एकूण प्रत्येकी ९ लाख रूपयांचे सहाय्य करण्यात आलं  आहे.    दुर्घटनेत जे आपदग्रस्त सात दिवसापेक्षा अधिक वेळ रूग्णालयात उपचार घेत होते, त्यांना प्रत्येकी १६...