September 20, 2025 8:24 PM September 20, 2025 8:24 PM

views 23

बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा २ वर्षात सुरू होणार असल्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा

महत्त्वाकांक्षी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचा सूरत ते बिलमोरा हा पहिला टप्पा २०२७ मध्ये सुरू होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली. या बुलेट ट्रेन मार्गावरच्या घणसोली ते शीळफाटा यादरम्यानच्या बोगद्याचं जोडकाम वैष्णव यांच्या उपस्थितीत आज पूर्ण झालं, त्यावेळी ते वार्ताहरांशी बोलत होते. या प्रकल्पाचा ठाण्यापर्यंतचा टप्पा २०२८ पर्यंत, तर वांद्रे-कुर्ला संकुलापर्यंतचा भाग त्यापुढच्या वर्षी पूर्ण होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.   घणसोली ते शीळफाटा हा ४ पूर्णांक ९ दशांश किलोमीटर...