February 23, 2025 8:05 PM February 23, 2025 8:05 PM
12
जर्मनीत संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु
जर्मनीत, गुंडेस्टॅग अर्थात संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. सोशल डेमोक्रॅ्टिक पार्टीचं आघाडी सरकार कोसळ्ल्यामुळे नवं सरकार आणण्यासाठी सुमारे ५ कोटी ९० लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २९९ मतदारसंघांमधे ४ हजार ५०६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ख्रिश्चन डेमोक्रॅ्टिक युनियन, ख्रिश्चन सोशल युनियन, ओलाफ स्कोल्झ यांची सोशल डेमोक्रॅ्टिक पार्टी आणि अलटरनेटिव्ह फॉर जर्मनी या चार प्रमुख पक्षांमधे ही लढत होत आहे.