May 24, 2025 1:42 PM

views 17

दहशतवादाविरुद्ध लढाईला जर्मनीच्या पाठिंब्याबद्दल परराष्ट्र मंत्र्यांकडून कृतज्ञता व्यक्त

भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईला आणि स्वतःचं संरक्षण  करण्याच्या अधिकाराला जर्मनीनं दिलेल्या पाठिंब्याबद्दल परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. बर्लिन इथल्या ‘जर्मन कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स’ या विषयावरील परिसंवादाला संबोधित करताना ते बोलत होते. जर्मनीनं अगदी सुरुवातीलाच भारतामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वाडेफुल यांनी भारताचा स्वतःचं संरक्षण करण्याचा अधिकार मान्य केला आहे, जर्मनीच्या या स्पष्ट भूमिकेमुळे भारताला प...

May 4, 2025 2:39 PM

views 6

जर्मनीमध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध मोर्चा

जर्मनीच्या बव्हेरियातल्या भारतीय समुदायानं पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काल म्युनिकमध्ये शांततापूर्ण निषेध मोर्चा काढला. सुमारे ७०० लोकांनी या मोर्चात भाग घेतला. जर्मन संसद सदस्य हान्स थेइस आणि म्युनिक सिटी कौन्सिलर डेलिजा बालिदेमाज यांनीही मोर्चात भाग घेतला.

February 23, 2025 1:47 PM

views 7

जर्मनीत सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान

जर्मनीत आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ शोल्ज यांचं सरकार कोसळल्यामुळे ही निवडणूक  होत आहे. या निवडणुकीत ओलाफ शोल्ज आणि फ्रेडरिक मर्झ यांच्या आघाड्यांमधे चुरशीची लढत आहे. जर्मनीची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं आणि युरोपमधे देशाला महत्वाचं स्थान मिळवून देण्याचं आश्वासन मर्झ यांनी दिलं आहे. तर देशातल्या अति उजव्या शक्तिंविरुद्ध केवळ आपणच लढू शकतो, असं शोल्ज यांनी म्हटलं आहे.

December 22, 2024 1:39 PM

views 19

जर्मनीत मॅग्डेबर्ग इथं झालेल्या भीषण हल्ल्याचा भारताकडून निषेध

जर्मनीत मॅग्डेबर्ग इथं झालेल्या भीषण हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात पाच लोक ठार तर दोनशेहून अधिक लोक जखमी झाल्याचं वृत्त आहे. जखमींमध्ये सात भारतीयांचाही समावेश होता. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात, नाताळच्या बाजारात झालेला हा हल्ला भीषण आणि माथेफिरू असल्याचं म्हटलं आहे. जखमी भारतीय नागरिकांवर रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. जर्मनीतील भारतीय दुतावास या हल्ल्यात झालेल्या जखमी झालेल्यांच्या संपर्...

October 24, 2024 8:18 PM

views 11

जर्मनी विरुद्धची हॉकी मालिका भारतानं गमावली

जर्मनी विरुद्धची हॉकी मालिका भारतानं आज गमावली. नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियमवर झालेल्या दुसऱा सामन्यात भारतानं ५-३ असा विजय मिळवला. कालचा सामना भारतानं गमावल्यानं दोन्ही देश १-१ अशा बरोबरीत होते. त्यामुळं मालिकेचा विजेता ठरवण्यासाठी पेनल्टी शूटआऊट घेण्यात आलं. त्यात भारतीय खेळाडूंना केवळ १ गोल करता आला, जर्मनीनं ३ गोल केले.

September 11, 2024 2:24 PM

views 18

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ॲनालेना बेरबॉक यांच्यात बर्लिनमध्ये विविध मुद्यांवर चर्चा

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी काल बर्लिनमध्ये जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ॲनालेना बेरबॉक यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली. पश्चिम आशियातील परिस्थिती, विशेषत: गाझा संघर्ष आणि त्याचे परिणाम यासह व्यापार, गुंतवणूक, शाश्वत विकास, कुशल मनुष्यबळ, तंत्रज्ञान, संरक्षण आणि सुरक्षा या विषयांवर लक्ष केंद्रित करून भारत आणि जर्मनी यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेण्यात आल्याचं जयशंकर यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. तसंच बर्लिनमधील परराष्ट्र कार्यालयाच्या वार्षिक राजदू...