January 12, 2026 1:16 PM

views 12

जर्मनीशी मैत्री आणि भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी वचनबद्ध – प्रधानमंत्री

भारत जर्मनीशी मैत्री आणि भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे, असं प्रतिपादन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज अहमदाबाद इथे जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. भारत आणि जर्मनीने आपल्या धोरणात्मक भागीदारीची २५ वर्षं पूर्ण केली असून यंदा दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंधांना ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. हे टप्पे सामायिक महत्त्वाकांक्षा, परस्पर विश्वास आणि सहकार्याला सातत्याने बळकटी देणारे आहेत, असंही मोदी म्हणाले.    तत्पूर्वी प्रधानमंत्री नरेंद...