January 8, 2026 1:10 PM January 8, 2026 1:10 PM

views 3

SriLanka: लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची राजकीय आणि लष्करी अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी त्यांच्या श्रीलंका दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राजकीय आणि लष्करी अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. भारत आणि श्रीलंका यांच्यातले द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक सुरक्षा, लष्करी देवाणघेवाण आणि श्रीलंकेच्या लष्कराला समर्थन देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. याशिवाय संरक्षण सहकार्य, मानवतावादी मदत, आपत्ती निवारण क्षेत्रातलं सहकार्य याबाबत जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी श्रीलंकेचे संरक्षण उपमंत्री, संरक्षण सचिव यांच्याशीही चर्चा केली.

January 14, 2025 5:53 PM January 14, 2025 5:53 PM

views 12

देशातले सैनिक, माजी सैनिक देशासाठी प्रेरणास्रोत-उपेंद्र द्विवेदी

देशातले सैनिक, माजी सैनिक आणि त्यांचा परिवार यांची एकूण संख्या सव्वा कोटी इतकी असून त्यांचा राष्ट्र उभारणीसाठी वापर करता येऊ शकतो, असं प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज केलं. पुण्यात नवव्या सशस्त्र माजी सैनिक दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. यावेळी वीरपत्नी आणि वीरमातांचा सन्मान द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आला. तसंच, सन्मान या नियतकालिकाचं प्रकाशनही करण्यात आलं.   देशात २४ लाख माजी सैनिक, ७ लाख वीरपत्नी तसंच, लष्करी सेवेत कार्यरत असलेले १२ लाख सैनिक आहे...