August 21, 2024 10:01 AM August 21, 2024 10:01 AM

views 78

माजी लष्करप्रमुख जनरल सुंदरराजन पद्मनाभन यांना श्रद्धांजली अर्पण

माजी लष्करप्रमुख जनरल सुंदरराजन पद्मनाभन यांना काल भारतीय लष्करातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चेन्नई इथं काल त्यांच्या पार्थिव देहावर संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक आजी माजी लष्करी अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सहकारी आणि कनिष्ठ यांच्यात पॅडी या नावानं ओळखल्या जाणाऱ्या पद्मनाभन यांनी ४३ वर्षांपेक्षा जास्त काळ देशसेवा केली. २००० ते २०-०२ या काळात त्यांनी लष्करप्रमुख म्हणून काम केलं होतं.