November 29, 2025 6:53 PM
64
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात प्रचाराला जोर
राज्यातल्या २४३ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार संपायला २ दिवस शिल्लक आहे. त्यामुळं राज्यभरात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपरिषद निवडणुकीसाठी आज चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रापूर इथं प्रचारसभा घेतली. विकास आराखडा घेऊन भाजपा जनतेकडे जात आहे. भाजपाकडे निती, नियत आणि निधी असल्याने भाजपाच्या उमेदवारांना निवडून द्यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. याशिवाय वाशिम आणि गडचिरोली इथं मुख्यमंत्र्य...