June 19, 2025 3:14 PM June 19, 2025 3:14 PM

views 5

‘जेंडर बजेटिंग पोर्टलचं’ अन्नपूर्णा देवी यांच्याहस्ते उदघाटन

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी आज नवी दिल्ली इथं ‘जेंडर बजेटिंग पोर्टलचं’ उदघाटन केलं.   हे पोर्टल धोरणकर्ते आणि भागधारकांना लैंगिक समानतेवर आधारित अर्थसंकल्पीय पद्धती बळकट करण्यासाठी सुविधा केंद्र म्हणून काम करेल, अशी माहिती अन्नपूर्णा देवी यांनी यावेळी दिली.    यंदा एकूण अर्थसंकल्पाच्या ८ पूर्णांक ८६ शतांश टक्के रक्कम जेंडर बजेट साठी खर्च करण्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल असं त्या म्हणाल्या.